Take a fresh look at your lifestyle.

‘बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही।’; अनिरुद्धने लिहिली संजनासाठी खास बर्थडे पोस्ट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी लोकप्रिय वाहिनी स्टार प्रवाहवरील अत्यंत गाजलेली आणि गाजत असलेली मालिका ‘आई कुठे काय करते’ एका वेगळ्या लेव्हल ला पोहोचली आहे. सध्या या मालिकेत ट्विस्ट पे ट्विस्ट नंतर आता सुरु झाली आहे ती लगीनघाई. अभिषेक आणि अनघाचा विवाहसोहळा लवकरच पार पडणार आहे. यादरम्यान संजनाचा वाढदिवस विसरून कसं काय चालेल. अर्थात संजनाचा नव्हे तर अभिनेत्री रुपाली भोसलेचा आज वाढदिवस आहे आणि म्हणूनच अनिरुद्ध अर्थात अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले कि, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा रूपाली @rupalibhosle तिचा आदर्श वाक्य (Her moto of life) Love yourself first …then you will be able to love others, आधी स्वतःवर प्रेम करा.. मग आपल्याला जगावर प्रेम करता येईल . हॅपी बर्थडे रुपाली. खरंतर साधारणपणे, लोकांचे वाढदिवस असतात पण रूपालीचा वाढमहिना असतो, birthmonth असतो, birthday नाही, पूर्ण डिसेंबर महिना, डिसेंबरच्या एक तारखेपासून 29 तारखेपर्यंत दररोज एक किंवा दोन केक ती कापते, असंख्य तिचे फॅन्स तिला महिनाभर केक पाठवत असतात, डिसेंबर महिन्यात जवळजवळ 40 केक’s तिने कापले असतील.

तिचा वाढदिवस आमच्या सेटवर कोणीच विसरू शकत नाही, महिनाभर ती सगळ्यांना त्याची आठवण करून देते, मला वाटतं असंच आयुष्य जगावं, भरभरून, आयुष्य साजरे करावे लागते, तुम्ही एकदा जगा म्हणून किंग साइज जगा, किंवा रुपालीच्या मते, राणीसारखे जगा … आनंद सिनेमा चा डायलॉग आठवतो ” बाबू मोशाय जिंदगी बडी होनी चाहिये, लंबी नही.” आणि हे रूपाली कडून शिकायला मिळतं, कामाच्या बाबतीत तेवढीच श्रद्धा, वेळेचे महत्व, आपलं काम कसं चांगलं होईल ह्याचा सतत विचार करत रहाणं.

जवळजवळ पाचशे एपिसोड्स आम्ही एकत्र काम केलं, आणि असा एकही सीन तिच्याबरोबर चा कधीही Dull, किंवा ज्यात full energy नाही, असा कधीच गेला नाही, सतत ती scene चा विचार , कुठे जागा काढता येतील, तो सीन आणखीन इंटरेस्टिंग कसा करता येईल याचा विचार, बरं संजना है कॅरेक्टर फार सोपं नाहीये, पहिल्या एपिसोड पासून ते कधीच सोपं नव्हतंच, पण रुपालीने ते कॅरेक्टर खूपच वेगळ्या level नेऊन ठेवलं आहे. आणि दोघेही भिन्न स्वभावाच्या आहेत , कॅरेक्टर संजना आणि प्रत्यक्ष रुपाली. आज वाढदिवसाच्या रुपाली भोसले ला खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद, आयुष्याचा पुढचा प्रवास यशस्वी आणि सुखमय जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.