Take a fresh look at your lifestyle.

सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्रचे बेबी शॉवर; सोशल मीडियावर शेअर केले फोटो

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका सावनी रवींद्र हिने आपल्या मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाजाने नेहमीच सगळ्यांना मोहून टाकले आहे. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर तिने आपल्या चाहत्यांना ती आई होणार असल्याची आनंदाची बातमी दिली होती. तिने नवरा डॉ. आशिष धांडे यांच्या सोबतचे फोटो शेअर करत हि बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली होती. त्यानंतर आता तिने आपल्या बेबी शॉवरचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

गायिका सावनी रवींद्र हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर अकाउंटवर तिच्या बेबी शॉवरचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोसोबत तिने कॅप्शन मध्ये लिहिले आहे कि, माझ्या प्रिय मैत्रिणींनो तुम्ही मला स्पेशल वाटण्यासाठी जे केले त्यासाठी मी तुमची आभारी आहे.. खूप प्रेम.. अद्भूत लोकांसोबत अप्रतिम वेळ व्यतित केला.. याआधी सावनी रवींद्रने पहिल्यांदा जेव्हा हि गोड बातमी चाहत्यांना सांगितली, तेव्हा ती म्हणाली होती की, माझ्या मनात सध्या खूप अलौकीक भावना आहेत. ज्या मी शब्दात व्यक्त करू शकत नाही.

गायिका सावनी रवींद्रने एक उत्तम गायिका म्हणून नेहमीच एकापेक्षा एक अशी उत्तम गाणी गेली आहेत. यात अनेक गाणी तिने आईपणावर वेगवेगळ्या धाटणीची गायली आहेत. मग अंगाईगीत, डोहाळ जेवण किंवा मग बारश्याची गाणी देखील तिने याआधी गायली होती. त्यामुळे तिने म्हटले होते कि, आता मी स्वत: त्या भूमिकेत जाणार आहे. त्यामुळे आईपण अनुभवण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. याचसोबत ती पुढे म्हणाली होती की, मला अस वाटतं की प्रत्येक स्त्री ही नशीबवान असते. कारण ती आई होऊ शकते. आईपण काय असतं हे फक्त एक आईच जाणू शकते आणि सध्या मी मातृत्वाच्या उंबरठ्यावर आहे. आणि या फेजचा मी खूप आनंद घेते आहे.