Take a fresh look at your lifestyle.

अमिताभ बच्चन आणि हिमाचलच्या मुख्यमंत्र्यांची भेट; राज्यात फिल्मसिटी उभी करण्याची मुख्यमंत्र्यांची इच्छा !

0

टीम, हॅलो बॉलीवूड | हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांची अमिताभ बच्चन यांसोबत काल रविवारी भेट झाली. साधारण पाऊण तास झालेल्या भेटीत, आमचं सरकार राज्यात फिल्म सिटी उभी करण्याविषयीच्या सर्व प्रस्तावांवर विचार करत असल्याचं मुख्यमंत्र्यानी सांगितलं.

अमिताभ बच्चन आपल्या ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटासाठी आलीय भट्ट, रणबीर कपूर आणि दिग्दर्शक अयान मुखर्जी यांच्या सोबत सध्या मनालीमध्ये आहेत. निसर्ग संपन्न असलेल्या हिमाचल प्रदेशात फिल्म शूटिंगसाठी निर्माते कायमच आकर्षित होत आलेत. अनेक सुंदर आणि आदर्शवत अशी ठिकाणं या राज्यात आहेत.

चित्रपट निर्मिती मोठा व्यवसाय आहे, तो राज्याच्या आर्थिक विकासाला मोठी गती देऊ शकतो. त्यामुळे ” बच्चन यांच्याशी झालेल्या भेटीत आम्ही राज्यात फिल्म सिटी उभी करण्याच्या अनुषंगाने चर्चा केली. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य आणि कायदेशीर बाबी हाताळण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचं सांगितलं आणि बच्चन यांचं मार्गदर्शन घेतलं”, असं विधान मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांसमोर केले.

हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर आणि अमिताभ बच्चन यांची रविवारी भेट झाली.

Leave a Reply

%d bloggers like this: