Take a fresh look at your lifestyle.

आया आया, आया आया ‘बच्चन पांडे’; होळी विथ फुल्ल ऍक्शन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज दिनांक १८ मार्च २०२२ असून आजच्या दिवशी राज्यभरात सर्वत्र बच्चन पांडे रिलीज झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार, क्रिती सनॉन, अर्शद वारसी, पंकज त्रिपाठी, संजय मिश्रा, जैकलीन फर्नांडीज आणि अभिमन्यु सिंह या कलाकारांनी कमाल अभिनय साकारला आहे.

फरहाद सामजी दिग्दर्शित बच्चन पांडेने अगदी २ तास २६ मिनिटाच्या कालावधीत सर्व प्रेक्षक वर्गाला वेड लावले आहे. चित्रपटातील कथानक, कलाकारांचा अभिनय, गाणी आणि ऍक्शन अशा प्रत्येक बाबतीत हा चित्रपट अव्वल ठरला आहे.

बच्चन पांडे या चित्रपटात मायरा देवेकर म्हणजेच अभिनेत्री क्रिती सनॉनला एक चित्रपट बनवायचा असतो. हा चित्रपट काही साधासुधा नाही तर कोणत्यातरी भयंकर प्रलयकारी गँगस्टरवर तिला हा चित्रपट बनवायचा असतो. यासाठी ती अशा गँगस्टरच्या शोधात असते आणि अखेर तिचा हा घाम काढणारा शोध थांबतो. तिला बच्चन पांडे म्हणजेच अक्षय कुमार सापडतो आणि ती त्याच्यावर चित्रपट बनवायला लागते. यासाठी ती चित्रीकरण करू लागते. ती बच्चन पांडेवर चित्रीकरण करू लागते पण तो असा गँगस्टर आहे ज्याच्या हृद्दयाला पाझर फुटत नाही.

गँगस्टर बच्चन पांडेचा एक डोळा दगडाचा आहे. त्याचा डोळाच नाही तर त्याचे मनदेखील कठोर आहे. तो कोणालाही जीवे मारताना सध्या मिनिटाचा देखील विचार करत बसत नाही. पण तरीही मायराला बच्चन पांडेवर सिनेमा बनवण्यासाठी त्याच्याबद्दल सगळं काही जाणून घ्यायच असत.

यासाठी तिचा मित्र विशु म्हणजेच अभिनेता अर्शद वारसीसोबत बघवा येथे जाते. इथून सुरूवात होते या चित्रपटातील अॅक्शन, कॉमेडी आणि ड्रामाची. बच्चन पांडेवर चित्रपट बनवण्यात मायरा यशस्वी ठरते का बच्चन पांडेच्या हातून मरते? हे पाहण्यासाठी हा चित्रपट नक्की पहा.