Take a fresh look at your lifestyle.

‘बचपन का प्यार’ फेम सहदेव दिर्दो रोड अपघातात गंभीर जखमी; प्रकृती चिंताजनक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बचपन का प्यार मेरा भूल नही जाना रे’ म्हणत अलीकडेच सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारा छोटा सहदेव दिर्दो कधी सेलेब्रिटी झाला कळलंच नाही. यानंतर सहदेवबाबत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. सहदेवचा एका मोठ्या रोड अपघातात गंभीर जखमी झाला असल्याचे वृत्त समोर येत आहे. या अपघतात सहदेवच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली आहे.

या अपघातानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये गंभीर जखमी झालेला सहदेव दिसतोय. शिवाय त्याच्या डोक्याला जबर मार लागला असल्याचेही यात दिसत आहे. यानंतर त्याला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले होते आणि आता त्याची प्रकृती अद्याप अस्थिर असून चिंताजनक आहे अशी माहिती मिळतेय.

दरम्यान सहदेवचा अपघात झाल्याची बातमी समोर येताच सहदेवचे चाहते त्याच्या प्रकृतीबाबत चिंतेत आहेत. त्यात व्हायरल व्हिडिओमध्ये सहदेवला अॅम्ब्युलन्समध्ये हलवले जात असताना तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसतोय. इतकेच नव्हे तर सहदेवच्या डोक्याला झालेली गंभीर दुखापत स्पष्ट दिसत आहे. यामुळे त्याचे चाहते त्याच्या आरोग्यासाठी प्रार्थना करत आहेत. दरम्यान या व्हायरल व्हिडिओननंतर ‘सहदेववर पूर्ण आणि गरज असलेले सर्व उपचार केले जातील’, असे आश्वासन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिले. यानंतर सहदेवला जगदलपूर येथील वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले आहे. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे तो अद्याप ग्लानीत आहे आणि त्याची प्रकृती अजूनही गंभीर आहे.

सहदेव दिर्दोचा शाळेतील बचपन का प्यार हे गाणे गातानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यानंतर बॉलिवूड गायक बादशाह, आस्था गिल आणि रिको यांनी त्याच्यासोबत ‘बचपन का प्यार मेरा भूल नाही जाना रे’ हे गाणे बनवले. अगदी काही दिवसातच या गाण्यामुळे सहदेव लोकप्रिय झाला. त्याच्या गाण्याने अगदी सेलिब्रिटींचेही लक्ष वेधले. यामुळे सहदेवला ‘इंडियन आयडॉल १२’ या रिअॅलिटी शोमध्येदेखील बोलावण्यात आले होते. सहदेव या व्हिडिओमुळे इतका लोकप्रिय झाला होता की छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही त्यांची भेट घेत त्याचे गाणे ऐकले होते.