Take a fresh look at your lifestyle.

‘बचपन का प्यार’ Coming Soon; ट्रेंडिंग सहदेवसोबत रॅपर बादशाह बनविणार नवी बीट

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे, ज्यावर तुमच्या अंगी असलेली केवळ एक कला तुम्हाला रातोरात स्टार बनवू शकते. तसे सोशल मीडिया स्टार होण्यासाठी कला कमी येतेच शिवाय अतरंगी गोष्टी देखील अगदी सहज प्रसिद्ध होतात. सध्या सोशल मीडियावर अश्याच एका अतरंगी गोष्टीमुळे एक लहान मुलगा चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. इतकेच नव्हे तर सध्या ट्रेंडवर इथे तिथे सगळीकडे फक्त आणि फक्त तोच दिसतोय आणि म्हणतो काय? ‘बचपन का प्यार, मेरा भूल नही जाना रे’. होय..

या मुलाच्या आवाजातील या गाण्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. इतकेच नव्हे तर त्याच्या सादरीकरणाची छाप बॉलिवूड रॅपर बादशाहवर पडली आहे. या मुलासोबतचा एक फोटो बादशाह ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

छत्तीगढमधझील सुकमा जिल्ह्यातील छिन्दगढ येथे राहणारा हा मुलगा ज्याचे नाव सुखदेव आहे, तो केवळ एका गाण्याच्या सादरीकरणामुळे सोशल मीडियावर चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. त्याचा हा व्हिडीओ जेव्हा बॉलिवूड जगतातील प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या नजरेस पडला तेव्हा त्यालादेखील तो इतका आवडला कि त्याने थेट सहदेवची भेटच घेतली. सध्या बादशाहने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर दोघांचा एक फोटो शेअर केला आहे आणि या फोटोसह बचपन का प्यार कमिंग सून असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे बादशाह कायतरी नवीन आणि भन्नाट घेऊन येणार इतकं नक्कीच.

शिवाय बादशाहला भेटून सहदेव चंडीगडवरून छत्तीसगढमध्ये परतला तेव्हा छत्तीसगढचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनादेखील सहदेवच्या तोंडून ते गाण ऐकण्याचा मोह आवरला नाही. मग काय? मुख्यमंत्र्यांनाही त्याने बचपन का प्यार ऐकवलं आणि हा देखील व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

 

बादशाहच्या या पोस्टनंतर आता लवकरच तो सहदेवसह आपल्या रॅपर स्टाईलमध्ये हे गाणं सर्वांसमोर आणणार आहे, यात काही वादच नाही. नुकताच बादशाहने इंटरनेटवर एक व्हिडीओही शेअर केला होता. ज्यामध्ये बादशाहसोबत आस्था गिल आणि रिकोदेखील दिसत होते. जे या गाण्याच्या नव्या बीटवर धमाल करताना दिसले. मात्र यात सहदेव नव्हता. पण आता तो नव्या व्हिडिओत असण्याची शक्यता आहे. सहदेवचा हा वायरल व्हिडीओ शाळेतील शिक्षकासमोर गाताना तयार करण्यात आला होता. त्यानंतर तो सोशल मीडियावर इतका जास्त व्हायरल झाला कि सहदेव सोशल मीडिया स्टारच झाला. दरम्यान, या व्हिडिओनंतर अनेक सेलिब्रिटींनी याच्या बीटवर नवेनवे व्हिडीओ तयार केले आहेत आणि हे व्हिडीओ देखील चांगलेच चर्चेत आहे.