Take a fresh look at your lifestyle.

‘बाहुबली’ चे दिग्दर्शक एस.एस. राजामौली कोरोनामुक्त

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा करोना अहवाल आता निगेटिव्ह आला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयांचे रिपोर्ट्स सुद्धा निगेटिव्ह आले आहेत. जवळपास दोन आठवडे उपचार घेतल्यावर राजामौली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी करोनावर यशस्वीरित्या मात केला आहे. स्वतः राजमौली यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे.

“दोन आठवडे क्वारंटाइन होऊन पूर्ण झाले आहेत. आता आमच्यात करोनाची कोणतीच लक्षणं नाहीत. करोना चाचणी केल्यावर माझे आणि कुटुंबीयांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. आम्ही प्लाझ्मा डोनेशनसाठी तयार आहोत की नाही जे कळण्यासाठी तीन आठवड्यांचा कालावधी लागेल”, असं ट्विट राजामौली यांनी केलं आहे.

राजामौली यांनी करोनावर मात केल्यामुळे त्यांचे चाहते प्रचंड खुश होऊन चाहत्यांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी २९ जुलै रोजी राजामौली यांनी करोना झाल्याची माहिती चाहत्यांना दिली होती.सोबतच त्यांच्या कुटुंबीयांनादेखील करोना झाल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.