Take a fresh look at your lifestyle.

बजरंग दलाच्या निशाण्यावर ‘आश्रम 3’; वाहनांची तोडफोड करीत क्रू मेम्बर्सला केली मारहाण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या एम एक्स प्लेयरच्या आश्रम वेब सिरीजचा तिसरा भाग येऊ घातला आहे. मात्र बजरंग दलास हे काही मान्य नाही असे दिसत आहे. त्याचे झाले असे कि, रविवारी भोपाळमध्ये बजरंग दलाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी ‘आश्रम ३’च्या सेटवर राडा घातला आहे. दरम्यान, दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या यांच्या चेह-यावर शाई फेकून या कार्यकर्त्यांनी सेटचे नुकसान केले आहे. याशिवाय सेटवर काम करण्याऱ्या क्रू मेम्बर्सला धरपकड करीत बेदम मारहाण केली आहे. तर व्हॅनिटी व्हॅनसह इतर ५ वाहनांचीदेखील तोडफोड करण्यात आली आहे. दरम्यान या सर्व प्रकारात सेटवर काम करणाऱ्या ४ ते ५ कर्मचाऱ्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समोर येत आहे. या राड्यात काही पत्रकारांनाही मारहाण केल्याचे समजत आहे. परंतु धक्कादायक बाब अशी कि दिग्दर्शक प्रकाश झा यांनी पोलिसात तक्रार दिलेली नाही.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या जुन्या तुरुंगात अर्थात अरेरा हिल्स येथे आश्रम ३चे शूटिंग सुरु होते आणि यादरम्यान रविवारी संध्याकाळी बजरंग दलाच्या जवळपास अडीचशे सदस्यांनी सेटवर दंगा केला. यासह दिग्दर्शक आणि कलाकारांच्या नावाने निषेधार्थ घोषणा दिल्या. प्रकाश झा मुर्दाबाद, बॉबी देओल मुर्दाबाद अशा घोषणा देत या कार्यकर्त्यांनी प्रकाश झा यांना बाहेर बोलावले आणि बाचाबाची करीत त्यांच्या अंगावर शाईदेखील फेकली. यानंतर कार्यकर्त्यांनी व्हॅनिटी व्हॅन, कार, ट्रकमध्ये ठेवलेले सामान, आवारात उभ्या असलेल्या मशिन यांची तोडफोड केली. सेटवरील कर्मचा-यांनी विरोध केला असता त्यांना बेदम मारहाण करण्यात केली. या सर्व प्रकारामागे बजरंग दलाचे म्हणणे आहे कि,प्रकाश झा यांनी आश्रम वेबसीरिजद्वारे हिंदू धर्माची बदनामी केली आहे. याशिवाय वेबसीरिजचं नाव बदलल्याशिवाय शूटींग होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

 

दरम्यान बजरंग दलाचे प्रांतीय निमंत्रक सुशील म्हणाले, ‘प्रकाश झा यांनी आश्रम, आश्रम २ बनवली. आता आश्रम ३ चे शूटींग सुरू आहे. आश्रमात एक गुरू महिलांचं लैंगिक शोषण करतोय, असं त्यांनी दाखवलं आहे. चर्च किंवा मदरश्यांमध्ये असं दाखवण्याची त्यांची हिंमत आहे का? ते स्वत:ला काय समजतात? आम्ही बॉबी देओलला शोधतोय. त्याला त्याचा भाऊ सनी देओलकडून काही शिकायला हवं. त्यांनी वेबसीरिजचं नाव बदलावं अन्यथा आम्ही भोपाळमध्ये शूटींग होऊ देणार नाही. आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी नाव बदलण्याचं आश्वासन दिलं आहे. नाव बदललं नाही तर शूटिंगला परवानगी दिली जाणार नाही. इतकंच नाही तर ही वेबसीरिज प्रदर्शितही होऊ देणार नाही.’