Take a fresh look at your lifestyle.

बजरंगी भाईजानमधील मुन्नी झाली मोठी; सलमानच्या गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेता सलमान खानच्या बजरंगी भाईजान या चित्रपटातील मुन्नी आता बरीच मोठी झाली आहे. आधीहून अधिक सुंदर दिसणारी मुन्नी म्हणजेच बालकारलंकार हर्षाली मल्होत्राचा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. काही दिवसांपूर्वी तिने स्वतःचा डान्स व्हिडीओ पोस्ट केला होता. तिचा हा व्हिडीओ सलमानच्या राधे चित्रपटातील गाण्यावर डान्स करतानाचा आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतोय. सध्या हा व्हिडीओ तुफान वायरल होत असून ट्रेंडिंग व्हिडीओजपैकी एक आहे.

‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बालकलाकार हर्षाली मल्होत्राने अनेकांची मने या चित्रपटातून जिंकली होती. निरागस चेहरा आणि चेहऱ्यावर असलेले गोड स्मित हास्य हि तिची ओळख झाली होती. आजही तिचे ते हास्य प्रेक्षकांना भुरळ घालते. सध्या सोशल मीडियावर हर्षालीचा हा डान्स व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. मुख्य म्हणजे सलमान खानचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट ‘राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई’ मधील सिटी मार ह्या गाण्यावर तिने हा व्हिडीओ बनविला आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच ना..

हर्षालीने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने काळ्या रंगाची जीन्स आणि एक सुंदर फॅन्सी टॉप परिधान केला. ती या वेशात अतिशय क्यूट दिसत आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा हा डान्स व्हिडीओ जबरदस्त व्हायरल झाला आहे.

तिच्या या व्हिडिओवर चाहते मोठ्या प्रमाणात तिचे कौतुक करीत आहेत. सोबतच अनेकजण त्यावर कमेंट करताना दिसत आहेत. बजरंगी भाईजान या चित्रपटात हर्षालीने पाकिस्तानी मुलगी मुन्नीची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी हर्षालीने अनेक मालिकांमध्येही काम केले होते. ती कुबूल है, लौट आओ तृषा आणि सावधान इंडिया या मालिकेत दिसली होती.