Take a fresh look at your lifestyle.

बाला “शंभर कोटी” क्लबमध्ये, आयुष्यमान खुराणाचा सलग सातवा यशस्वी चित्रपट

0

जान-ए-फिल्लम । विद्यानंद कडुकर

आशयपूर्ण कथेची निवड आणि उत्कृष्ट अभिनय यामुळे अभिनेता आयुष्यमान खुराणा याची एक वेगळी ओळख इंडस्ट्री मध्ये निर्माण झाली आहे. सलगच्या यशस्वी चित्रपटांमुळे त्याचं स्टारडम एका विशिष्ट उंचीवर गेलंय. सामाजिक विषयासह मनोरंजनाने भरपूर असलेले चित्रपट बॉक्स ऑफिस वर कमाल करत आहेत. काही आठवड्यांपूर्वी रिलीज झालेल्या ‘बाला’ने आज १५व्या दिवशी कमाईमध्ये सातत्य ठेवत १०० कोटींच्या घरात प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा हा या वर्षीचा हा १५ वा चित्रपट आहे. एकूणच सामाजिक विषयावरचे चित्रपट चांगला प्रतिसाद मिळवत असून देशातलं चित्र हळू हळू बदलवताना दिसत आहे.


अकाली टक्कल पडल्यामुळे आत्मविश्वास हरवून बसलेल्या तरुणाची व्यथा बाला चित्रपटामध्ये दाखवली आहे. आयुष्मान खुराणाने या तरुणाची भूमिका अगदी भारावून टाकणारी केली आहे. त्याच्या सोबत असलेल्या भूमी पेडणेकर आणि यामी गौतम यांनी देखील आपल्या भूमिकांना योग्य न्याय दिला आहे. सौरभ शुक्ला, सीमा पहावा, जावेद जाफरी, अभिषेक बॅनर्जी नैसर्गिक अभिनय चित्रपट मनोरंजनाचे मूल्य वाढवतो. अमर कौशिक यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून निरेन भट्ट यांनी चित्रपटाचे कथानक, संवाद लिहले आहेत. दरम्यान काही दिवसांपूर्वी हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. उजाड चमन या चित्रपटाच्या कथेमध्ये साधर्म्य असण्याच्या कारणावरून निर्मात्यांनी कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती. मात्र याचा कोणताही परिणाम चित्रपटावर झाला नसून चित्रपटाने १०० कोटींचा पल्ला पार केला आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: