Take a fresh look at your lifestyle.

व्हिडीओ बॅन करा अन्यथा..; सनी लिओनीच्या ‘मधुबन’ गाण्यावर मथुरेतील पुजाऱ्यांची आक्रमक भूमिका

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीतील कमी काळात मोठे नाव झालेली अभिनेत्री सनी लिओनी तिच्या नव्या गाण्यामुळे सध्या चांगलीच चर्चेत आहे. मात्र हि चर्चा कौतुकास्पद नव्हे तर घृणास्पद भावनेने केली जात आहे. गायिका कनिका कपूरने गायलेले आणि सनीवर चित्रित झालेले मधुबन हे गाणे या चर्चेचे कारण आहे. या चर्चेचे रूपांतर आता आक्रमक वळण घेऊ लागले आहे. मधुबन या गाण्यामूळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत असा आरोप करीत या गाण्यावर बंदी आणा अशी मागणी मथुरेतील पुजाऱ्यांनी केली आहे.

दिनांक २२ डिसेंबर २०२१ रोजी मधुबन हे गाणे प्रदर्शित झाले. हे गाणे मनोज यादव यांनी लिहिले असून गायिका कनिका कपूर आणि अरिंदम चक्रवर्ती यांनी गायले आहे. तर या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य यांनी केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटले आणि अखेर मथुरेतील पुजाऱ्यांनी आपला विरोध दर्शवित गाण्यावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. शिवाय गाण्यावर बंदी आणली नाही तर आपण न्यायालयात जाऊ, अशी भूमिका काही पुजाऱ्यांनी घेतली आहे. मथुरेतील पुजाऱ्यांनी सनी लिओनीच्या ‘मधुबन में राधिका नाचे’ गाण्याला विरोध दर्शविण्याचे कारण सांगताना म्हटले कि, या गाण्यात सनी लिओनीने अश्लील नृत्य केले आहे. यामुळे त्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत.

माध्यमांनी दिलेलया वृत्तानुसार, वृदांवनमधील संत नवलगिरी महाराज यांनी या मुद्द्यावरून सरकारकडे अभिनेत्री सनी लिओनीवरदेखील कारवाई करा अशी मागणी केली आहे. शिवाय गाण्यावर सरकारने बंदी घालावी आणि असे न केल्यास आपण न्यायालयात जाऊ अशी आक्रमक भूमिका व्यक्त केली आहे. याशिवाय सनी लिओनीने गाण्यातील अश्लील दृश्य काढून टाकून माफी मागावी अन्यथा तिला भारतात राहू देणार नाही, असंही नवलगिरी महाराजांनी म्हटलं आहे.