Take a fresh look at your lifestyle.

‘पाण्याची मजा पेपरला नाही’; सिद्धार्थ चांदेकरचा बाथरूममधला ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। किती आले आणि किती गेले.. किती डोहात बुडाले.. पण एक अभिनेता सिद्धार्थ चांदेकर असा आहे जो येतो थांबतो आणि गाजवतो. सध्या सिद्धार्थ आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. पण… पण म्हणून काय झालं? तो थोडीच चाहत्यांचं मनोरंजन थांबवेल. तो नुकताच लंडनहून मुंबईत परतलाय. यानंतर त्याने एक व्हिडीओ इंस्टावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो म्हणतोय कि, लंडनमध्ये असताना तुला खूप मिस केलं तुझी खूप आठवण आली. आता अर्थात हे वाक्य पत्नी मितालीसाठी असणे साहजिक आहे. पण असे नसून या भावना कुण्या दुसऱ्याच गोष्टीसाठी आहेत. हा व्हिडीओ पाहिलात कि तुम्हीही समजून जालं कि तो कुणाबद्दल आणि का बोलतोय.

सिद्धार्थने अत्यंत भावूक होत हा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात तो म्हणतोय, ‘यार लंडनमध्ये तुझी खूप आठवण आली. सगळं होतं तिथे पण तु नाही. किती प्रगत देश आहे तो किती काय काय आहे तिथे. पण तुला जे जमतंना ते कोणालाच जमू शकत नाही. काय मिस केलं यार मी तुला, काय मिस केलं. तुझ्यासारखं कोणीही नाहीये या जगात कोणीही नाही. आय लव्ह यू’.

व्हिडीओमध्ये सिद्धार्थ असं म्हणतो आणि शेवटी बाथरुममध्ये असलेल्या स्प्रेकडे कॅमेरा फिरवतो. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सिद्धार्थ लंडनमध्ये असताना बाथरुममधल्या स्प्रेला मिस करत होता हे समजत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी आणि कलाकारांनाही हसू आवरलेलं नाही.

या व्हिडिओवर अनेक कलाकारांनी भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. यावर अभिनेत्री स्पृहा जोशीने सिद्धार्थला ‘घाणेरडा’ म्हटलंय. तर पुजा सावंत, सई ताम्हणकर, रेशम टिपणीस यांनी ‘हो हे खरंय’ असंही म्हटलंय. इतकंच नाही तर अभिनेता अभिजीत खांडकेकरनं ‘सत्यवचन’ अशी कमेंट केली आहे. नेटकऱ्यांपैकी अनेकांनी आम्हाला वाटलंच होत तू ट्विस्ट आणणार असे म्हटले आहे.

तर एकाने म्हटलंय ‘पाण्याची मजा पेपरला नाही’. माहितीनुसार, सिद्धार्थ लंडनमध्ये अभिनेता लोकेश गुप्ते, अलका कुबल, पूजा सावंत या कलाकारांबरोबर शुटींग करत होता. दरम्यान कलाकारांसाठी सगळ्या सुख सोयी उपलब्ध होत्या.यात खाण पिणं कशाची कमी नव्हती पण सगळं असूनही सिद्धार्थनं बाथरूममधला वॉटर स्प्रे लंडनमध्ये प्रचंड मिस केला. हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करतो आहे.