Take a fresh look at your lifestyle.

BB 15’ची विनर तेजस्वी प्रकाश दिसणार ‘नागिन’च्या भूमिकेत; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हि तिच्या लोकप्रिय मालिका आणि चित्रपटांसाठी सतत चर्चेत असते. एकताच्या अनेक मालिकांनी प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे. तिची ‘नागिन’ ही मालिका तर छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेतली मालिका ठरली आहे. आतापर्यंत सलग ५ यशस्वी पर्वांनंतर या मालिकेचा ६ वा सीजन लवकरच येणार आहे. अलीकडे याचा प्रोमोदेखील प्रदर्शित झाला होता. मात्र, मालिकेत नागिन कोण साकारणार हे कुणाला माहित नव्हते. यानंतर आता नुकतीच बिग बॉसच्या १५ व्या सिजनची विजेती ठरलेली तेजस्वी प्रकाश नागिनची भूमिका साकारणार असल्याची एकताकडून घोषणा करण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी नागिनच्या आगामी पर्वाची घोषणा केल्यानंतर त्याचा एक प्रोमोदेखील रिलीज करण्यात आला. मात्र या पर्वातील नागिनची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीचा चेहरा वा नाव सांगितले नव्हते. माहितीप्रमाणे, यावेळी ‘नागिन ६’ ची कथा विषाणूपासून संरक्षण करणे, अशी आहे. व्हायरसपासून देशाला वाचवण्याचे काम नागिन हाती घेणार आहे. आतापर्यंत नागिन तिच्या प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी लढली आहे. आता व्हायरसपासून लोकांना वाचविण्यासाठी लढणार असल्याचे सांगितले जात आहे. म्हणजेच या पर्वत नागिन देशासाठी लढताना दिसणार आहे.

बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले कालच पार पडला. दरम्यान प्रतीक सेहजपाल, तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे टॉप ३ फायनलिस्ट स्पर्धक ठरले होते. यानंतर स्पर्धेची विजेती अभिनेत्री तेजस्वी प्रकाश ठरली. यानंतर बिग बॉस १५’ची विजेती ठरलेल्या तेजस्वीला शोमध्ये असतानाच नागिन ६ची ऑफर मिळाली होती. त्यामुळे एकता कपूरच्या या नव्या शोमध्ये नागिनच्या भूमिकेत तेजस्वी दिसणार हे नक्की झाले आहे. त्यामुळे तेजस्वीच्या चाहत्यांमध्ये आनंदाची लाट पाहायला मिळत आहे.