Take a fresh look at your lifestyle.

BB फेम हिंदुस्थानी भाऊला अटक; विद्यार्थी आंदोलन आक्रमक केल्याचा आरोप 

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाइन | हिंदुस्थानी भाऊ म्हणजेच विकास पाठक याला आज पोलिसांनी अटक केली आहे.  हिंदुस्थानी भाऊ याने एक विडिओ शेअर केल्यानंतर राज्यातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. त्यानंतर विद्यार्थ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन केले. मुंबईतील धारावी भागात हा ‘हिंदुस्थानी भाऊ’ आला आणि त्याच्या समर्थनासाठी विद्यार्थी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले आणि पाहतापाहता हिंसक झाले.त्यामुळे अखेर हिंदुस्थानी भाऊ ला अटक करण्यात आली आहे.

आज हिंदुस्थानी भाऊ ला 11 वाजता कोर्टात हजर केलं जाणार आहे.  दहावी-बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घ्या या मागणीसाठी मुंबईसह अनेक ठिकाणी शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. या विद्यार्थ्यांना हिंदुस्थानी भाऊने भडवल्याचं स्पष्ट झाल्यानंतर त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. अखेर आज त्याला मुंबईच्या धारावी पोलिसांनी अटक केली आहे.

धारावी पोलीस ठाण्यात विकास जयराम पाठक (हिंदुस्थानी भाऊ), (41 वर्षे रा. ठि.19/बी प्यारीनगर गोविंद पाटील खार दांडा,खार पश्चिम मुंबई.) विरोधात रजिस्टर क्रमांक ३७/२०२२ कलम ३५३,३३२,४२७,१०९, ११४,१४३,१४५,१४६,१४९,१८८,२६९,२७० भा.द.वि सह कलम ५१(ब) आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह कलम 37 (३),१३५ जमाव बंदी आदेश भंगसह कलम 3 महाराष्ट्र सार्वजनिक मालमत्ता नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर हिंदुस्थानी भाऊ एक युट्युबर आहे. आपल्या बेधडक वक्तव्यांमुळे तो नेहमीच चर्चेत असतो. याशिवाय हिंदी बिग बॉसच्या १३ व्या सिजनमध्ये हिंदुस्थानी भाऊ झळकला होता. त्यामुळे त्याचा चाहता वर्ग फार मोठा आहे.