Take a fresh look at your lifestyle.

टपरीवरचा चहा भारी…चहावाले काका भारी…; उत्कर्षने घेतला चाहत्याच्या टपरी चहाचा आस्वाद

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन अलीकडेच संपला आहे. पण शो संपला असला तरीही शोची चर्चा मात्र कायम आहे. आजही प्रेक्षकांच्या तोंडात बिग बॉस मराठी ३ मधील स्पर्धकांची नावे असतात. याचे कारण म्हणजे प्रत्येकाची जिंकायची जिद्द आणि प्रत्येकाचा खेळ. एकूण १५ सदस्यांपैकी लोकांच्या मनात घर केलं ते टॉप ६ स्पर्धकांनी. या तिसऱ्या पर्वाला आतापर्यंतच्या सर्व सीजनपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी सांगितले होते. याचा प्रत्यय आता येऊ लागला आहे.

या सिजनमधील टॉप ६ मध्ये असणारा ऑलराऊंडर खेळाडू उत्कर्ष शिंदे याने बिग बॉसच्या माध्यमातून स्वतःची एक नवी ओळख निर्माण केली आहे. उत्कर्ष शिंदेने असंख्य चाहते आधीपासून होतेच पण ते शिंदेशाही घराण्यामुळे आणि त्याच्या गळ्यामुळे. पण यावेळी त्याला त्याच्या खेळामुळे ओळखले जात आहे. त्याच्या चाहत्यांपैकी एक चक्क चहावाला आहे आणि हे समजताच उत्कर्ष थेट त्या टपरीवर पोचला. याचा व्हिडीओ शेअर करीत त्याने एक पोस्ट केली आहे.

उत्कर्षला जेव्हा आपल्या चाहत्याविषयी समजलं. तेव्हा तो थोडीच थांबणार होता. तो निघाला थेट आपल्या चाहत्याच्या भेटीला. उत्कर्षने डायरेक्ट जाऊन आपल्या चहावाल्या चाहत्यांची भेट घेतली आणि मग काय? टपरीवरच्या चहाचा सूर्रर्रर्रर्रकन आस्वाद घेतला. उत्कर्ष शिंदेने नुकतीच आपल्या चहावाल्या चाहत्यांची भेट घेतली असल्याचा हा अनुभव आणि टपरीवरच्या चहाचा आस्वाद आपल्या अन्य चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केलेला आहे. याचा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे.

 

हा व्हिडिओ शेअर करत उत्कर्षने लिहिले की, “टपरी वरचा चहा जितका भारी होता, तितकाच तो चहा बनवणारे काका भारी होते” बिग बॉसचे आणि माझ्या परफॉर्मन्सचे चाहते जेव्हा जेव्हा भेटतात तेव्हा तेव्हा वेगळाच आनंद होतो. गावागावात ते शहर शहरात जिथे दिसतो तिथे रसिक माय बाप भरभरून प्रेम देत आहेत हे पाहून शंभर दिवस बिग बॉस मधे एक कलाकार म्हणून माझ्या टास्कमधून, ऍक्टिंग, गाण्यात, होस्टिंग, ऍंकरिंग मधून #ऑलराऊंडर #मास्टरमाईंड #टास्क मास्टर नाव तर कमावलच पण त्याहून हि जास्त महाराष्ट्राच मन जिंकल ह्याचा अभिमान जास्त आहे. महाराष्ट्राच प्रेम जितक मला लाभत आहे त्याचा मी सदैव ऋणी राहील.