Take a fresh look at your lifestyle.

BB मराठी 3- चला निरोप घ्यायची वेळ झाली..; आज्जीला निरोप देताना भावुक झाले सदस्य 

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरात आठवड्याभरापूर्वी सर्वांची लाडकी आज्जी आली आणि आता आज्जी परत निघाली आहे. या पूर्ण एका आठवड्यात घरातील सदस्यांप्रमाणे आज्जी देखील एक सदस्य होऊन गेली. कधी हसली, कधी रंगवली, कधी खाऊ घेऊन आली तर कधी शिक्षा देऊन मायेने फुंकरही घातली. यामुळे इतक्या कमी वेळात सगळेच सदस्य आजीशी जोडले गेले. घरातील सर्वानीच आजीसोबत बराच वेळ घालवला, तिच्यासमोर भांडले, रडले, व्यक्त झाले, खाऊ खाल्ला कि नंतर सगळे एकत्र यायचे. पण आता वेळ आली आहे आजीचा निरोप घेण्याची. आजीचा आवाज पुन्हा एकदा आणि शेवटचा घरामध्ये घुमला, तो निरोप घेण्यासाठी. मग काय सगळे भावुक झाले आणि अगदी रडू लागले.

सर्व लाडक्या बाळांचा निरोप घेताना आजी म्हणाली कि, “मला इथे येऊन एक आठवडा झाला सुद्धा. चला म्हणजे आता निरोप घ्यायची वेळ आली आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही तुमच्या आजीला जे काही सांगायचे राहून गेले असेल ते मला सांगाना…” आजीच्या या घोषणेनंतर प्रत्येक सदस्याला आपल्या भावना आवरणे जणू कठीण झाले आणि प्रत्येकाचे डोळे लहान मुलांप्रमाणे भरले. सगळेच सदस्य इतके भावुक झाले कि आपल्या आज्जीला सांगायचं राहील ते सांगताना अरे धाय मोकलून रडताना दिसले. दरम्यान प्रत्येकाने आपल्या भावना, खंत, तक्रार आणि प्रेम आजीसमोर व्यक्त केले.

यात घरातील सदस्य मीरा जगन्नाथ व्यक्त होताना म्हणाली, “आजी माझी तक्रार आहे तुमच्याकडे खूप लवकर गेलात तुम्ही. जेव्हा पूर्ण जगाशी मी एकटी लढत होते, कोणीही नव्हते माझ्याबरोबर तेव्हा मला वाटायचे. माझी आई देखील म्हणायची जर आजी असती तर तुझ्याबरोबर असती. मी जिथे राहिली असती तिथे ती राहिली असती.

अगदी १६ – १७ वयाची मी असताना तू गेलीस आणि त्याच्यानंतर सगळ्या जगासोबत मी एकटी लढली आहे तुझ्याशिवाय… पण इथे बिग बॉसच्या आजीला बघितल्यावर मला एक वेगळे असे कनेक्शन वाटले होते. म्हणजे समोर आहे बस एवढेच हवे आहे, बाकी काही नसेल तरी चालेल. बस्स दिसत रहा कधी कधी… ! मिराशिवाय इतरही सदस्यांनी आपल्या भावना मांडल्या. ते काय म्हणाले आणि कसे व्यक्त झाले हे पाहण्यासाठी पाहत राहा ‘बिग बॉस मराठी ३ फक्त कलर्स मराठीवर.