Take a fresh look at your lifestyle.

BiggBoss 15’चा फिनाले SidNaaz’ सोबत होणार स्पेशल; शेहनाज देणार सिद्धार्थला श्रद्धांजली

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या १३व्या सिजनचा विजेता आणि सोबतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याने अचानक जगाचा निरोप घेतला आणि सगळीकडे शोकमय वातावरण निर्माण झाले. आज उरल्या त्या फक्त सिद्धार्थच्या आठवणी आणि त्याच्या कुटुंबियांच्या तसेच चाहत्यांच्या डोळ्यातून ओघळणारे पाणी. गेल्या वर्षातील २ सप्टेंबर हा दिवस अतिशय वाईट ठरला. याच दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने सिद्धार्थचे निधन झाले. दरम्यान सिद्धार्थची मैत्रीण शेहनाज इतकी हतबल झाली होती कि तिची अवस्था पाहून सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले होते. हि सिडनाझची जोडी बिग बॉसमध्ये तयार झाली तर बिग बॉस त्यांच्याशिवाय कसा पूर्ण होईल. म्हणूनच बिग बॉसच्या १५ व्या सिजनच्या ग्रँड फिनालेसाठी शेहनाज उपस्थित राहणार आहे. यावेळी ती सिद्धार्थला श्रद्धांजली वाहणार आहे.

‘बिग बॉस १५’चा ग्रँड फिनाले आता जवळ आला आहे. याचा शेवट खास बनवण्यासाठी ‘सिडनाझ’ जरुरी आहेत. म्हणूनच यावेळी शोमध्ये ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थला श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. सप्टेंबर २०२१ मध्ये सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला खरा पण त्याला विसरलय कोण? सिद्धार्थच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला पण बिग बॉसला त्याचा खरा हिरो आजही स्मरणात आहे. म्हणूनच यावेळी सिद्धार्थची खास मैत्रीण शहनाझ उपस्थित राहून सोबत सिद्धार्थाच्या आठवणींना उजाळा देताना दिसेल. चॅनलने या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. तो पाहून चाहत्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी आले आहे.

कलर्सने इंस्टावर शोचा प्रोमो व्हिडिओ शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये सिद्धार्थ आणि शहनाझचे काही व्हिज्युअल दाखवले आहेत. जे या दोघांनी बिग बॉसच्या घरात घालवलेल्या सोनेरी क्षणांची आठवण करून देतात. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय कि, “शहनाझ गिल जेव्हा येईल तेव्हा ग्रँड फिनाले आणखी खास असेल #SidNaaz’च्या नात्याला मनापासून श्रद्धांजली. या २९ आणि ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री ८ वाजता बिग बॉस १५ चा ग्रँड फिनाले पाहायला विसरू नका.” हा प्रोमो व्हिडिओ पाहून चाहते भावुक होत आहेत.