Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आयच्या गावात!! शिव ठाकरेचं अमरावतीत दणक्यात स्वागत; सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
February 15, 2023
in Trending, Hot News, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
56
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेमध्ये विजेतेपद मिळवून एमसी स्टॅन चांगलाच प्रकाश झोतात आला आहे. बिग बॉस १६ चा विजेता एमसी स्टॅन होईल अशी कुणालाच आशा नव्हती. पण प्रेक्षकांचा कौल एमसी स्टॅनला मिळाला आणि तो जिंकला. रनरअप म्हणून शिव ठाकरेने धन्यता मानली असली तरीही त्याचे चाहते मात्र असली विजेता तूच असे म्हणताना दिसले. यानंतर आता जेव्हा शिव ठाकरे त्याच्या मूळ घरी अमरावतीला परतला तेव्हा त्याच्या चाहत्यांनी मोठ्या उत्साहात आणि दणक्यात त्याच स्वागत केलं.

View this post on Instagram

A post shared by Shiv Thakare (@shivthakare9)

‘बिग बॉस मराठी सीजन २’चा विजेता म्हणून शिव ठाकरेची आधीच हवा होती. यानंतर जेव्हा शिव बिग बॉस हिंदी सीजन १६’मध्ये आला तेव्हा मात्र अनेकांनी त्याच्यावर सुरुवातीला टीका केली. पण त्याची खेळी आणि त्याचा अंदाज हा नेहमीच चर्चेत राहिला. हळूहळू शिवचा खेळ लोकांना आवडू लागला आणि त्याच्या नावावर विजेतेपद होण्याची पूर्ण तयारी चाहत्यांनी केली.

Craze of #ShivThakare 🔥🔥🔥

Roads blocked, crackers bursting, music, dhol & crowd shouting and going crazy. #ShivKiSena #BB16 #BiggBoss @colorstv @BiggBoss pic.twitter.com/yTkvV7uv8F

— 𝑲𝒂𝒔𝒉𝒚𝒂𝒑 ✧ (@medico_sane) February 14, 2023

मात्र शिव ठाकरे जिंकू शकला नाही. याची थोडी का होईना त्याच्या मनात खंत राहिली असली तरी चाहत्यांनी मात्र त्याच्यावर प्रेमाचा पुरेपूर वर्षाव केला आहे. त्याच वागणं, बोलणं आणि खेळणं सगळ्यावर प्रेक्षकांनी प्रेमाची उधळण केली आहे. चाहत्यांनी त्याच्यावरील प्रेम व्यक्त करताना अमरावतीत त्याच जल्लोषात स्वागत केलं आणि यावेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस सीजन १६ चा ग्रँड फिनाले आणि सक्सेस पार्टी झाल्यांनतर शिव ठाकरे त्याच्या मूळ घरी अमरावतीला पोहोचला. शिव येताच अमरावतीकरांनी तेथील रस्ते अडवले आणि मोठी आतिषबाजी करत, फटाके उडवत, ढोल- ताशे वाजवत जल्लोषात त्याच स्वागत केलं. तर काहींनी शिवला हार घातले, नजर काढली, चिअर केलं. यावेळी शिव ठाकरे त्याच्या गाडीच्या सनरूफमध्ये उभा राहून आपल्या चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना दिसला. लोकांचा उत्साह, प्रेम आणि अमरावतीकरांचा जल्लोष पाहून शिव भारावून गेला होता.

Tags: Bigg Boss 16 ContestantInstagram PostShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group