Take a fresh look at your lifestyle.

वाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते अभिजित ; ‘या’ कारणांसाठी शाहरुख साठी गाणी गायचं सोडलं

हॅलो बॉलीवूड ऑनलाइन | बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक अभिजीत आजही म्युझिक इंडस्ट्रीतील सर्वात बहारदार गायकांपैकी एक आहेत. एकेकाळी अभिजीत एका सुपरस्टारचा आवाज होते. आज त्यांच्या वाढदिवशी जाणून घेऊ त्यांचा एका खास किस्सा…. एक काळ असाही होता की, बॉलिवूड किंग शाहरूख खानचा आवाज अभिजीत भट्टाचार्य होते. शाहरूखच्या प्रत्येक सिनेमात अभिजीत गाणं गात होते आणि अभिनेत्याची भरभरून कौतुक होत होतं. पण गायकाच्या वाट्याला कौतुक न येणं नेहमीच इंडस्ट्रीची समस्या राहिली आहे. असंच काहीसं अभिजीतसोबत झालं. ज्यानंतर त्यांनी शाहरूख खानसाठी गाणी गायच सोडलं.

अभिजीत भट्टाचार्य आणि शाहरूख खानला सिनेमातील गाण्यासाठी एकसारखं बघण्यात आलं. अभिजीत शाहरूखचा आवाज होते. आणि त्यांची गाणी फॅन्स आवडतही होती. अभिजीत यांच्यानुसार त्यांनी शाहरूख खानसाठी आवाज दिला तेव्हा तो एक रॉकस्टार होता. नंतर तो लुंगी डान्स करू लागला.

काय होतं शाहरूखसाठी गाणी न गाण्याचं कारण?

एकदा एका इव्हेंत दरम्यान श्वेता सिंहने अभिजीत यांना विचारले की, तुम्ही शाहरूख खानसाठी गाणी गाणं का सोडलं? यावर अभिजीत म्हणाले होते की, ‘मी माझ्या आवाजाने सुपरस्टार बनवले आहे. जोपर्यंत मी शाहरूख खानसाठी गात होतो तेव्हा तो रॉकस्टार होता. जेव्हा मी त्याच्यासाठी गाणं बंद केलं. तो लुंगी डान्सवर आला’.

अभिजीत म्हणाले होते की, ‘मी छोट्याशा कारणासाठी शाहरूख खानसाठी गाणं सोडललं. ‘मै हूं ना’ सिनेमात त्यांनी सगळ्यांना दाखवलं होतं. स्पॉटबॉयपासून ते सगळ्यांना. पण गायकाना कुणीच दाखवलं नाही. हेच ओम शांती ओम सिनेमावेळी झालं. स्टार्सने धूम ताना गाणं गायलं. त्या गाण्याला माझा आवाज होता. पण हे दाखवलं नाही. मला याचं वाईट वाटलं. मी त्यांना माझं नाव लिहिण्यासाठी का सांगू? समस्या ही नाही की, माझ्याकडे एखाद्या गोष्टीची कमतरता आहे. मग मी त्यांना काही का मागू?

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Comments are closed.