Take a fresh look at your lifestyle.

भावा..! थंडीचं गाणं आलं ना.. ऐकलं का न्हाई? न्हाई? मग ऐक

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। खास रे संगीत आणि स्टोरीटेल मराठीच्या संयुक्त विद्यमाने बोचऱ्या थंडीत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना याड लावण्यासाठी ‘बेक्कार थंडी’ हे खास विंटर अँथम सॉंग लाँच करण्यात आले आहे. हे सॉंग रिलीज होताच अवघ्या महाराष्ट्रात ‘हवा’ झाली आहे. या गाण्याच्या माध्यमातून ‘खास रे’च्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केले आहे. या गाण्याची बोली सध्या अख्खा थंडीने कुडकुडलेला महाराष्ट्र बोलतोय. हे गाणं एक ढिंच्याक रॅप सोंग आहे आणि आतापर्यंत या गाण्याने दहा हजाराहून अधिक व्युज मिळवले आहेत.

नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या ‘खास रे’ च्या शिलेदारांनी यंदाही आपला गावरान बाज जपला आहे. मुख्य म्हणजे त्यांनी वाढलेल्या थंडीच्या पार्श्वभूमीवर गोठवणारे कल्ला कुल सॉन्ग तयार केले आहे. हे धमाल थंडीचे गाणे प्रेक्षकांसमोर त्यांनी आणले आणि प्रत्येकाला वेड लावले आहे. संतोष शिंदे यांनी ह्या व्हिडिओ गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. तर संजय श्रीधर यांनी हे गाणे लिहिले आहे . शिवाय त्यांनी स्वतःच हे गाणे गेले आहे. तर संदेश कालेकर यांनी हे गाणे संगीतबद्ध केले आहे.

मुख्य म्हणजे पुण्यातील बोपगावमध्ये या गाण्याचे चित्रीकरण करण्यात आले आहे. एका संपूर्ण रात्रीत बोचणाऱ्या थंडीमध्ये या गाण्याचे चित्रीकरण या कलाकारांनी पूर्ण केले आहे. यामध्ये विशेष म्हणजे गावातील जवळ जवळ सगळ्याच ग्रामस्थांना या थंडीच्या अँथम सॉंगमध्ये अभिनय करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे गावकरी पण खुश झाले आणि त्यांनी चित्रीकरणाला उत्तम प्रतिसाद दिला. यातूनच उदयास आले हे थंडीचे गाणे. नरेंद्रकुमार फिरोदीया यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली आहे. सध्या हे गाणे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.