Take a fresh look at your lifestyle.

हा रविवार ठरणार हॉरर कॉमेडी स्पेशल; संज्या- रंज्या करणार ‘बेनवाड’ गावाला शापमुक्त

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। रविवार म्हटलं कि काहीतरी खास असणं हि जणू परंपराच झाली आहे. त्यामुळे एकतर जेवणात लज्जतदार हवं आणि मनोरंजनात काहीतरी झकास.. म्हणूनच हा रविवार स्पेशल करायला भाऊ कदम आणि संदीप पथक सज्ज झाले आहेत. या रविवारी म्हणजेच १३ फेब्रुवारी २०२२ रोजी झी टॉकीजवर भाऊ आणि संदीपचा हॉरर कॉमेडी चित्रपट बेनवाड प्रक्षेपित होणार आहे. हा चित्रपट झी टॉकीज ओरिजिनलचा भाग आहे. रविवारी दुपारी १२.०० वा. आणि सायंकाळी ६.०० वा. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

साधारण प्रत्येक गावाची एखादी दंतकथा असते. तशीच दंतकथा बेनवाड या गावाची आहे. हे गाव एका विचित्र शापात अडकले आहे आणि या गावात संज्या आणि रंज्या असे दोन इरसाल भाऊ राहत आहेत जे गावाला वाचविताना दिसतील.

संज्या आणि रंज्याच्या रूपात भाऊ कदम आणि संदीप पाठक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करणार आहेत. या चित्रपटात बेनवाड गावाच्या रक्षणाची जबाबदारी संज्या आणि रंज्याकडे सोपवण्यात येते आणि त्यानंतर काय आणि कशा गोष्टी घडतात? त्याला संज्या – रंज्या कसे सामोरे जातात? आणि गावाला शापमुक्त कसे करतात? याची मजेशीर गोष्ट म्हणजे बेनवाड.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Talkies (@zeetalkies)

दिग्दर्शक सुमित संघमित्र यांनी हा चित्रपट हॉरर कॉमेडी कथानकासह मनोरंजक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षक पहिल्यांदाच भाऊ आणि संदीपची केमिस्ट्री अनुभवत आहेत. या दोघांसोबत त्यांच्या नायिकाही या चित्रपटात धमाल करताना दिसणार आहेत. भूतकाळाच्या खुणा दाखवत वर्तमानात गावात घडणाऱ्या विचित्र घटनांचा शोध घेणारा ‘बेनवाड’ हा हॉरर कॉमेडी चित्रपट असून आमच्या दोघांची वेगळी धमाल केमिस्ट्री यातून प्रेक्षकांना दिसेल, असं भाऊ कदम आणि संदीप पाठक यांनी सांगितले.