Take a fresh look at your lifestyle.

पडली रे पडली भारती सिंग पडली; व्हिडिओ झाला वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कॉमेडी क्‍वीन म्हणून ओळखली जाणारी भारती सिंग हिने आपल्या कॉमिक टायमिंगने प्रेक्षकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. ऑनस्क्रीन काय आणि ऑफस्क्रीन काय, आपल्या फॅन्सना हसवल्याशिवाय तिच्या मनाला काही शांती मिळत नाही. तिने स्वतःचा एक मजेशीर व्हिडिओ आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. तो बघून हसू आवरणे जरा अशक्यच आहे. इन्स्टाग्रामवरच्या या व्हिडिओमध्ये भारती एका झोपाळ्यावरून धडामधुडूम पडते आणि स्वतःच हसताना दिसत आहे.

या व्हिडिओमध्ये एका झाडाच्या फांदीला एक झोपाळा बांधला असल्याचे दिसत आहे. झोपाळ्यावर बसलेली भारती मस्ती करताना दिसत आहे. याच दरम्यान तिचा तोल जाऊन ती झोपाळ्यावरून खाली जमिनीवर पडताना दिसतेय. मात्र झोपाळ्यावरून पडल्यानंतरही ती स्वतःच हसताना दिसत आहे, हे काय ते विशेष. सुदैवाने झोपाळ्यावरून पडल्यानंतरही भारतीला कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. भारतीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी भारती सिंग व तिचा पती हर्ष लिंबाचिया हे दोघेही ड्रग्जच्या प्रकरणामुळे चर्चेत होते. इतकेच नव्हे तर या कारणामुळे त्यांचे चाहते प्रचंड नाराजी व्यक्त करताना दिसले होते. या कठीण काळातून बाहेर पडत आता भारती पुन्हा एकदा मैदानात उतरली असून कदाचित याच विषयाला अनुसरून तिने व्हिडीओचे कॅप्शन दिले असेल असा अंदाज वर्तविला जात आहे.

हा व्हिडीओ आपल्या सोशल मीडियावर शेअर करताना, ‘पडल्यानंतरही उठता आले पाहिजे,’ असे भारती सिंगने या कॅप्शनमध्ये लिहिले आहे. त्याचबरोबर कंबर दुखावल्याचेही तिने म्हटले आहे. तिचे हे कॅप्शन आणि स्वतःचीच फजिती दाखवणारा हा मजेशीर व्हिडिओ तिने स्वतःहून फॅन्ससमोर आणण्याच्या तिच्या खेळकर वृत्तीला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या व्हिडिओवर तिच्या चाहत्यांनी अनेक कमेंट्स आणि लाईक केले आहेत.