हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘चला हवा येऊ द्या’ या धम्माल कॉमेडी मराठी शोने नुसता महाराष्ट्र नाही तर देश विदेशसुद्धा गाजवले आहेत. गेल्या काही वर्षात या शोवरील प्रेक्षकांचे प्रेम इतके प्रचंड वाढले आहे कि काही विचारूच नका. याचे कारण म्हणजे या कॉमेडी शोमधील एकापेक्षा एक हटके स्किट आणि कलाकारांची विनोदी शैली. याच शोच्या माध्यमातून भाऊ कदम आणि कुशल बद्रिके हे लोकांच्या घराघरात आणि मनामनांत पोहचले. भाऊ आणि कुशल या दोघांच्या जोडीने आतापर्यंत अनेक प्रेक्षकांचे खळखळून मनोरंजन केले आहे. पण ज्यांनी लोकांना हसवलं त्यांच्यावर रडायची पाळी आली. त्याच झालं असं कि, भाऊ आणि कुशल या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भाऊ आणि कुशल या दोघांविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केली आहे. पांडू सिनेमात पोलिसांची टिंगलटवाळी केल्याप्रकरणी हि तक्रार दाखल केल्याचं समजतंय. भाऊ आणि कुशल या दोघांनी पांडू या मराठी चित्रपटात पोलीसाची भूमिका साकारली आहे.
दरम्यान सेटवर अनेक कलाकार स्क्रिप्टसह तयारी करत बसलेले असताना अचानकच पोलीस सेटवर आले आणि सर्वांची तंतरली. सेटवर आलेल्या पोलिसांनी भाऊ आणि कुशलविरुद्ध माजी पोलीस अधिकाऱ्याने तक्रार दाखल केल्याचे सांगितले. यामुळे दोघांनाही सेटवरुन बाहेर जावं लागलं. यानंतर सेटबाहेर त्यांचं पोलिसांसोबत बोलणं झालं आणि ते सेटवर परतले.
दरम्यान भाऊ आणि कुशलने आपली बाजू पोलिसांसमोर पूर्णपणे मांडण्याचा अतोनात प्रयत्न केला. यावेळी पोलीस अधिकारी आणि भाऊ, कुशल यांचे बोलणे सुरु असताना निलेश साबळेनेही मध्यस्थी करीत विषय संपवण्याचा प्रयत्न केला. यानंतर अचानक तुम्हाला काय वाटलं पोलीस तुम्हाला घेऊन जातील का? घाबरु नका, हे खरे पोलीस नाही. हा एक प्रँक आहे, असं कार्यक्रमाचा दिग्दर्शक निलेश साबळे बोलला आणि भाऊ, कुशलचा जीव भांड्यात पडला. यानंतर भाऊ आणि कुशलची भांभारलेली तोंड पाहून सेटवर हशा पिकला. च्या जीवात जीव आला. हा सर्व प्रकार कार्यक्रमाचाच एक भाग होता आणि हा प्रँकचा व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.