हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। झी मराठीवरील चला हवा येउद्या हा कार्यक्रम प्रेक्षकांचे अव्वल मनोरंजन करतो. त्यामुळे हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहे. या कार्यक्रमातील कलाकारांवर लोक प्रचंड प्रेम करतात. त्यातील भाऊ कदम कुणाला माहित नाही? भाऊ त्याच्या विनोदांनी अगदी पोट दुखेपर्यंत हसवितो. कित्येकदा भाऊ चालू स्किट मध्ये आपले संवाद विसरतो आणि त्यावरही लोक खळखळून हसतात एवढेच नाही तर मी स्क्रिप्ट विसरलो किंवा स्क्रिप्ट पाठांतर नाही असे देखील भाऊ अनेकवेळा कार्यक्रमात विनोदी शैलीने बोलताना दिसतो.असा हा लोकांचा आवडता भाऊ संवाद का बरं विसरतो? याचे उत्तर कुशलने हा व्हिडीओ शेअर करीत दिले आहे.
या व्हिडिओत भाऊ चक्क पाठांतर करतोय असे सांगून झोपताना दिसतोय. हा मजेशीर व्हिडीओ सध्या वायरल व्हिडीओज पैकी एक आहे.
भाऊ आपली स्क्रिप्ट कशाप्रकारे पाठ करतो याचा हा मजेशीर व्हिडिओ कुशल बद्रिकेने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओत भाऊ स्क्रिप्ट वाचत असताना झोपी गेलेला आपल्याला दिसतोय. त्यावर तू आरामात झोपत का नाहीस?, असे कुशल त्याला विचारतो. त्यावर मी झोपत नाहीये…. तर पाठांतर करतोय असे सांगत भाऊ परत झोपताना दिसतोय…
कुशलने हा व्हिडिओ शेअर करताना भाऊ कदम यांचं पाठांतर चालू आहे, सगळ्यांनी शांत रहा… असे मजेशीर कॅप्शन दिले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून केवळ एका दिवसांत १ लाख २७ हजाराहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. या व्हिडिओवर भाऊचे चाहते मजेशीर कमेंट देत आहेत. त्यामुळे नेहमीप्रमाणेच “भाऊ रॉक्स”, असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही.