Take a fresh look at your lifestyle.

खळखळून हसवायला ‘भिरकीट’ येतोय; 17 जून रोजी होणार प्रदर्शित

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांनो.. हसायचंय…? कि खळखळून हसायचंय..? कारण खळखळून हसायचे असेल तर तयार व्हा कारण येत्या १७ जून २०२२ रोजी ‘भिरकीट’ प्रदर्शित होतोय. क्लासिक एंटरप्राईज प्रस्तुत, सुरेश जमतराज ओसवाल आणि भाग्यवंती सुरेश ओसवाल निर्मित ‘भिरकीट’चे काही दिवसांपूर्वीच एक भारी मजेशीर पोस्टर रिलीज झाले होते. यातच आता चित्रपटाचा टिझर समोर आलाय. या हसू फुलविणाऱ्या भिरकीट चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, ऋषिकेश जोशी, मोनालीसा बागल, कुशल बद्रिके, सागर कारंडे, लंगड्या उर्फ तानाजी गालगुंडे, कैलास वाघमारे, उषा नाईक, याकूब सय्यद या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत.

‘भिरकीट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक अनुप जगदाळे आपल्या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाले कि, ‘मुळात भिरकीट’ म्हणजे काय? चित्रपटाचे नावच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहे. ‘भिरकीट हे आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात अदृश्यरिता मागे लागलेले असतेच. मुळात ही आपल्या सगळ्यांची गोष्ट आहे. टिझरवरून कळले असेलच माणूस माणूस म्हणून किती उरलेला आहे. त्याच्यात किती बदल झाला आहे. हे सर्व भिरकीटमध्ये पहायला मिळणार आहे. हा एक मल्टी स्टारर सिनेमा आहे. अर्थात ती कथेची गरज होती. मात्र यात सगळे कसलेले कलाकार आहेत.

पुढे म्हणाले कि, ‘देऊळ’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गिरीश कुलकर्णी यात तात्याच्या भूमिकेत आहेत. यापूर्वी आपण वळू, विहीर, गाभीचा पाऊस, जाऊद्याना बाळासाहेब, फास्टर फेणे अशा विविध चित्रपटांमध्ये त्यांचा दर्जेदार अभिनय पाहिलेला आहे. बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही त्यांनी आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. ‘भिरकीट’मध्ये आता ते पुन्हा एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत.”

चित्रपटाचे कथानक काहीसे असे आहे कि, पैसा कमावण्याचे प्रसिद्धीचे, सुखी रहाण्याचे भिरकीट सगळ्यांच्या मागे असते. पण ‘तात्या’ मात्र वेगळ्याच दुनियेत जगण्याच्या प्रयत्नांत आहेत. त्यांच्या या दुनियेत नेमकं काय होतं आणि त्यातून तो बाहेर येतो का..? हे ‘भिरकीट’मध्ये पाहायला मिळेल.