Take a fresh look at your lifestyle.

सावधान मंजुलिका! रूह बाबा इज कमिंग; ‘भुल भुलैय्या 2’चा टिझर एकदा पहाच

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बहुचर्चित चित्रपट भूल भुलैय्या २ लवकरच रिलीज होणार आहे. हा चित्रपट २००७ साली रिलीज झालेल्या प्रियदर्शनच्या भूल भुलैय्या चा सिक्वल भाग आहे. तेव्हा या चित्रपटात अक्षय कुमार आणि विद्या बालन मुख्य भूमिकेत होते. तर यावेळी मात्र चेहरे बदलले आहेत आणि थरार तोच आहे. सध्या या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाला असून चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन एका भन्नाट भूमिकेत प्रेक्षकांसमोर येत आहे. तर त्याच्यासोबत कियारा अडवाणीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते फारच उत्सुक आहेत.

कार्तिक आर्यनच्या भूल भुलैया २ चा टीझर सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या टिझर मध्ये तुम्ही पाहू शकता कि एक जुनी पुराणी हवेली दिसत आहे. मागे आमिजे तोमार हे गाणे वाजत आहे. यानंतर एक एक झुंबर बंद होत जात दरवाजाचे कुलूप उघडते आणि अचानक एक काळी सावली संतप्त स्वरूपात येते….पुढे..? पुढे काय? काळ्या रंगाचे कपडे परीधान केलेले रुह बाबा एंटर करतात. पण टिझर नंतर एक प्रश्न कायम आहे. तो म्हणजे.., काय हि तीच मंजुलिका आहे..? जिने गेल्यावेळी थरार निर्माण केला होता. काय रुह बाबा तिचा निकाल लावतील..? आणि अजून बरेच असे प्रश्न आहेत जे प्रेक्षकांना पडले आहेत. त्याची उत्तर हवी असतील तर हा चित्रपट पाहणे बंधनकारक आहे.

कियाराने हा टिझर ट्विटरवर शेअर केला आणि त्याला कॅप्शन दिले, “झपाटलेली हवेली आपले दरवाजे पुन्हा उघडण्यासाठी सज्ज आहे! तू तयार आहेस का?” टीझरमध्ये कार्तिकची एंट्री ‘रुह बाबा’ म्हणून दाखवण्यात आली आहे. तर हवेलीत प्रवेश करताना राजपाल यादव त्याला गळ घालताना दिसत आहे. पहिल्या भागात राजपाल यांची भूमिका छोटे पंडित होती. भूल भुलैया २ हा अनीस बज्मी दिग्दर्शित आणि भूषण कुमार निर्मित हिंदी कॉमेडी हॉरर चित्रपट आहे. यामध्ये कार्तिक आर्यन, राजपाल यादव, तब्बू आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका आहेत.