Take a fresh look at your lifestyle.

‘भोपाळी म्हणजे होमोसेक्शुअल’; वादग्रस्त वक्तव्यामुळे विवेक अग्निहोत्री नेटकऱ्यांच्या रडारवर

0

हॅलो बॉलिवुड ऑनलाईन। अलीकडेच चर्चेत आलेला काश्मिरी पंडितांच्या जीवनाचे भाष्य करणारा चित्रपट म्हणजे ‘द काश्मीर फाईल्स’. या चित्रपटामुळे साहजिकच त्याचे दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री देखील चांगलेच चर्चेत आहेत. या चित्रपटाविषयी मत असणारे दोन वेगळे गट आहेत. यातील एक गट म्हणतो कि यात अर्धसत्य आहे. तर भाजप नेते कौतुक करून दमत नाहीत असे दिसून येत आहे. एव्हढं कमी का काय..? म्हणून आता विवेक अग्निहोत्री एका भलत्याच वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक हे व्हायरल होत असलेले वादग्रस्त विधान अग्निहोत्रींनी कधी आणि कुठे केले ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र सोशल मीडियावर याचे पडसाद उमटताना दिसून येत आहेत.

एकीकडे ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटासाठी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तर आता दुसरीकडे मात्र त्याच विवेक अग्निहोत्रींनवर टीकांचा भडीमार होताना दिसतोय. सोशल मीडियावर विवेक अग्ननिहोत्रींचं एक वादग्रस्त वक्तव्य जोरदार व्हायरल होतय. ज्यात विवेक अग्निहोत्री म्हणाले कि, मी भोपाळमध्ये मोठा झालो मात्र मी भोपाळी नाही. भोपाळी हे एक वेगळ कनेक्शन आहे. भोपाळीचा एक वेगळाच अर्थ होतो. तो मी तुम्हाला नंतर खासगीत समजवेन. भोपाळीचा अर्थ होतो समलैंगिक. असे वक्तव्य केल्यानंतर यावर भलताच वाद निर्माण झाला आहे. यामुळे सोशल मीडियावर वादाचे वादळ निर्माण झाले आहे.

आधीच विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यामुळे सोशल मीडिया युजर्स नेटकऱ्यांनी संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. त्यात आता काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंहदेखील चांगलेच संतापले आहेत. त्यांनी कडक शब्दात अग्निहोत्रींचा समाचार घेतला आहे. दिग्विजय सिंह यांनी विवेकवर निशाणा साधत ट्विट केले आहे. यात त्यांनी लिहिले कि, विवेक अग्निहोत्री जी, हा तुमचा स्वतःचा वैयक्तिक अनुभव असू शकतो. तो सामान्य भोपाळी रहिवाशाचा नाही. मी ७७ पासून भोपाळ आणि भोपाळींच्या संपर्कात आहे. पण मला हा अनुभव कधीच आला नाही. तुम्ही कुठेही राहिला असाल त्यामुळे हा “संगतीचा प्रभाव असू शकतो”.