Take a fresh look at your lifestyle.

सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है। ‘भुज’चा ट्रेलर अंगावर काटा आणणारा; एकदा पहाच

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘भुज : द प्राईड ऑफ इंडिया’ या देशभक्तीवर आधारलेल्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून अगदी अंगावर सर्रर्रर्रर्रकन काटा आणणारा आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता अजय देवगण, शरद केळकर, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, नोरा फतेही अशी जबरदस्त स्टार कास्ट आहे. ‘भुज : द प्राइड ऑफ इंडिया’चा ट्रेलर इतका जबरदस्त आहे की, त्याचे कौतुक करावे तितके कमीच वाटते. या ट्रेलरनंतर निश्चितच सर्वांची उत्सुकता शिगेला पोहचेल याची खात्री वाटते.

या ट्रेलरची सुरुवात १९७१ सालामधील गुजरातच्या भुजमधून होते. यानंतर, भारतीय तिरंगा आकाशात उंच फडकताना दिसला आहे. दरम्यान पाकिस्तानी हवाई दलाने भुज एअर बेसवर हल्ला केला असल्याचे कळते आणि या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारत देश तयार होतो. त्यानंतर एअर फोर्स स्क्वॉड्रॉन लीडर विजय कर्णिकची भूमिका साकारणाऱ्या अजय देवगनच्या एंट्रीला भुजची सुरक्षा तुमच्या हातात आहे असे म्हटले जाते. पुढे संजय दत्तची एंट्री दाखवताना तो म्हणतो कि, ‘कबीरा क्यों जंग का ऐलान है, आज खुदा खुद परेशान हैं।’ आणि पुढे तो पाकिस्तानी सैन्याशी लढा देताना दिसतो आहे. नंतर मराठी अभिनेता शरद केळकरची बॉक्सिंग रिंगण ते युद्धभूमी अशी एक झलक दाखवण्यात आली आहे.

दरम्यान या ट्रेलरमध्ये दिसते कि, सोनाक्षी सिन्हाला यावेळी अत्यंत वेगळी भूमिका मिळाली आहे. या चित्रपटात ती अनेक अ‍ॅक्शन सिन देताना दिसणार आहे. तर नोरा देखील फक्त गाण्यासाठी नसून या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. या ट्रेलरमध्ये जबरदस्त अ‍ॅक्शन, लक्षवेधक संवाद आणि थ्रिलर फाइट सीन आहेत. इतकेच नव्हे तर प्रत्येकाची भूमिकेसाठीची उत्तम कामगिरी यात दिसत आहे. ट्रेलर सोबत स्क्रीनवर एक संदेशही येतोय की, ‘आम्ही अयशस्वी झालो, आम्ही पडलो, मोडलो, पण मग आम्ही उठलो, त्याग केला आणि त्यानंतर हिंमतीचा जन्म झाला.

‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट येत्या १३ ऑगस्ट २०२१ रोजी डिस्नी प्लस हॉटस्टार रिलीज होणार आहे. चित्रपटाची कथा भुजमधील १९७१ सालातील भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे. अहवालानुसार, चित्रपटाचे साउथ स्टंट कोऑर्डिनेटर काही दिवस उपलब्ध नव्हते, यामुळे म अजयने स्वत: अ‍ॅक्शन सिक्वन्स दिग्दर्शित केले. एका वेबसाईटनुसार, ‘अजयने चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सीक्वेन्सचे चित्रीकरण केले आहे हे खरे आहे. चित्रपटाच्या अ‍ॅक्शन सिक्वेन्सचे दिग्दर्शक पेटल हेन मार्चमध्ये शूटसाठी येऊ शकले नाहीत. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांनी काही काळ पवई स्टुडिओ बुक केल्यानंतर अजयला या सीन्सची जबाबदारी घ्यायला सांगितले.