Take a fresh look at your lifestyle.

पान मसाला प्रकरणाला कायदेशीर वळण; बॉलिवूडचे दिग्गज कलाकार अडचणीत

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर पानमसाला ब्रॅण्डसाठी जाहिराती करणारे कलाकार अडचणीत आल्याचे दिसून आले होते. हे ट्रोलिंग संपेल संपेल म्हणता म्हणता संपेनाचं उलट आता आणखीनच अडचणी वाढल्या आहे. गुटखा आणि पान मसालासारख्या उत्पादनांची जाहिरात केल्यामुले आधीच चाहता वर्ग नाराज होता आणि आता तर हे बॉलीवूड कलाकार कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. होय. या प्रकरणामुळे बिग बी अमिताभ बच्चन, रणवीर सिंग, शाहरुख खान आणि अजय देवगण या कलाकारांच्या विरोधात पान मसालाचं प्रमोशन करण्याप्रकरणी बिहारच्या कोर्टात केस दाखल करण्यात आली आहे.

या कलाकारांच्या विरोधात दाखल केलेली हि केस मुजफ्फरपुरमध्ये सामाजिक कार्यकर्ता तमन्ना हाश्मी यांनी दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी जेव्हा अक्षय कुमार अशाच एका जाहिरातीत दिसला तेव्हा हे प्रकरण मोठं झालं आणि याला वादाचं रुप मिळालं. यावरून अक्षयला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. यानंतर त्याने चाहत्यांची जाहीर माफी मागत अशा जाहिरती परत करणार नाही असे स्पष्ट सांगितले. शिवाय जाहिरातीसाठीचे पैसे दान करणार असेही सांगितले. तर दुसरीकडे शाहरुख आणि अजय देवगण या जाहिरातीमुळे ट्रोल होतच राहिले.

दरम्यान बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन अशाच एका तंबाखूजन्य उत्पादन कंपनीच्या प्रॉडक्टचे प्रमोशन करत होते. गतवर्षीच त्यांचा या कंपनीसोबत करार संपला असून त्यानंतर त्यांनी अधिकृतरित्या एक निवेदन सादर करीत माहिती दिली होती. पण असं असलं तरीही कायदेशीर वादातून त्यांची सुटका नाही हेच खरं.

सामाजिक कार्यकर्ता असलेल्या तमन्ना हाश्मि यांनी रणवीर सिंग, अजय देवगण, शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांच्या विरोधात सेक्शन ४६७, ४६८, ४३९ आणि १२० B अंतर्गत केस दाखल केली आहे. याचिकेत या कलाकारांवर पैशांच्या लालसेपोटी आपल्या प्रसिद्धिचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. या केसची सुनावणी २७ मे २०२२ रोजी होणार आहे.