Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

आ रा राssss राsss खतरनाक! प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; ‘मुळशी पॅटर्न- भाग 2’ येणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
January 10, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, सेलेब्रिटी
Mulshi Pattern 2
0
SHARES
449
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला ‘मुळशी पॅटर्न’सारखा खतरनाक चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आता आणखी एक मोठी घोषणा केली आहे. मुळशी पॅटर्न या चित्रपटाला मिळालेला भरघोष प्रतिसाद आणि यश पाहता आता लवकरच या चित्रपटाचा पुढील भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हि माहिती स्वतः प्रवीण तरडे यांनी ‘महाराष्ट्र किंग आणि क्विन २०२३’ या कार्यक्रम प्रसंगी दिली. ‘मुळशी पॅटर्न २’च्या घोषणेसोबतच ‘धर्मवीर २’देखील लवकर येणार असल्याचे प्रवीण तरडे यांनी सांगितले.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न या चित्रपटाचा दुसरा भाग येणार अशी घोषणा करताच प्रेक्षकांमध्ये एक वेगळाच उत्साह संचारला आहे. मुळशी पॅटर्न हा चित्रपट मराठी रसिकाप्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतला होता आणि आता दुसरा भाग येणार हि माहिती मिळताच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

मुळशी पॅटर्न या चित्रपटात शेतकऱ्यांच्या जमिनी उद्योगांसाठी बळकावल्या गेल्या आणि यामुळे कित्येक तरुण कुटुंबासाठी गुन्हेगारी विश्वाकडे वळले. त्या शेतकऱ्यांच्या पिढ्यांची विदारक कहाणी आणि जमिनी गेल्याने कुटुंबाला पोसणार कसं..? असा प्रश्न पडलेल्या त्या पिढीची पावलं हाताला काम शोधत गुन्हेगारीकडे कशी वळली..? हे दाखवण्यात आले आहे.

View this post on Instagram

A post shared by Pravin Vitthal Tarde (@pravinvitthaltarde)

प्रवीण तरडे यांनी मुळशी पॅटर्न २’ची घोषणा केली त्या कार्यक्रमात पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमृता फडणवीस तसेच बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ हे मान्यवर उपस्थित होते. आता दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मुळाशी पॅटर्न २ ची घोषणा केल्यामुळे पहिल्या चित्रपटाप्रमाणे यातही गुन्हेगारी विश्वाचं अचूक चित्रण, हटके संवाद, ऍक्शन सीन आणि भावनिक कथा असं सगळ्याच मिक्शर पुन्हा पहायला मिळणार आहे यात काही शंकाच नाही. हे सगळंच कमाल आणि भारी असणार आहे. त्यामुळे आता मुळशी पॅटर्न २ बाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.

Tags: Instagram Postmarathi directorMulshi Pattern 2Pravin Vitthal TardeUpcoming Marathi Movie
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group