Take a fresh look at your lifestyle.

“पीकू” चित्रपटानंतर बिग बी आणि दीपिका पुन्हा एकदा एकत्र दिसणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची जोडी पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. हे दोघे कलाकार ‘द इंटर्न’ या हॉलिवूड चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये एकत्र काम करणार असल्याची माहिती आहे. यापूर्वी दोघांनी ‘पीकू’ चित्रपटात एकत्र काम केले होते. त्यानंतर थेट आता हि जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. खरंतर या आगामी चित्रपटात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर झळकणार होते. मात्र, एप्रिल २०२० मध्ये त्यांचे निधन झाले. त्यामुळे या चित्रपटात बिग बींची वर्णी लागणार आहे.

अभिनेत्री दीपिका पादुकोणने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर ‘द इंटर्न’ चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. सोबतच तिने लिहिले की, ‘माझ्या सर्वात खास को-स्टारबरोबर पुन्हा काम करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. मी अमिताभ बच्चन यांचे इंटर्न अ‍ॅडॉप्शनमध्ये स्वागत करते. हा चित्रपट नॅन्सी मेयर्स यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला ‘द इंटर्न’ या चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. ‘द इंटर्न’ हा हॉलिवूड चित्रपट २०१५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात हॉलिवूडचे दिग्गज अभिनेते अ‍ॅन हॅथवे आणि रॉबर्ट डी निरो मुख्य भूमिकेत दिसले होते. आता अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोण या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची कथा जेष्ठ नागरिक कार्यक्रमाअंतर्गत कंपनीत इंटर्नशिपसाठी अर्ज करणाऱ्या रॉबर्टच्या व्यक्तिरेखेशी संबंधित आहे. ही व्यक्तिरेखा अ‍ॅन हॅथवे या पात्राशी जोडली गेली आहे. कॉर्पोरेट जगाच्या गर्दीत या दोघांमध्ये असलेले संबंध उत्तम प्रकारे दाखवण्यात आले आहेत. या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दीपिका हि अमिताभ बच्चन यांच्या बॉसच्या भूमिकेत दिसणार आहे. थोडक्यात दीपिकाचा ‘द इंटर्न’ हा चित्रपट कामकाजाच्या भोवती फिरणार्‍या आयुष्यातील नातेसंबंधांवर आणि त्यातील जिव्हाळ्यावर आधारलेला आहे. हा चित्रपट सध्याच्या युगातील ऑफिससेसच्या वातावरणावर आधारित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.