Take a fresh look at your lifestyle.

Big breaking news! बच्चन पितापुत्रापाठोपाठ आता ऐश्वर्या आणि आराध्याही कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई | बॉलिवुड अभिनेते अमिताभ बच्चन आणि पुत्र अभिषेक बच्चन कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यामुळे बॉलिवुड इंडस्ट्रीसह त्यांच्या कोट्यवधी चाहत्यांना देखील धक्का बसलेला असताना आता त्यांना दुसरा धक्का बसला आहे. अभिषेक बच्चनची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या बच्चन या दोघी देखील कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याची धक्कादायक बातमी स्पष्ट झाली आहे. के पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त विश्वास मोटे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.

आता या दोघींना देखील क्वारंटाईन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे आता बच्चन कुटुंबापैकी एकूण ४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. श्वेता नंदा, अगस्त्य नंदा, नव्या नंदा आणि खुद्द जया बच्चन हे बच्चन कुटुंबातील इतर सदस्य मात्र कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

शनिवारी रात्री जेव्हा अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले, तेव्हा त्यांच्या घरातल्या इतर सदस्यांचं स्क्रीनिंग करण्यात आलं होतं. तेव्हा यामध्ये त्यांची प्रकृती ठीक होती. शरीराचं तापमान सामान्य होतं. मात्र, त्यांच्या कोरोना चाचणीचे रिपोर्ट आज अखेर आल्यानंतर त्यात ऐश्वर्या आणि आराध्या या दोघी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे.