Take a fresh look at your lifestyle.

मोठे डिरेक्टर मला चित्रपटात घेत नाहीत! – अक्षय कुमार

0

सुपरस्टार अक्षय कुमारचा ‘गुड न्यूज’ चित्रपट येत आहे. त्या चित्रपटाच्या लाँच दरम्यान एका पत्रकाराने “तुम्ही नेहमी नवीन दिग्दर्शकांसोबत काम का करता?” या प्रश्नावर उत्तर देताना संगितलं की “मोठे डिरेक्टर्स मला त्यांच्या चित्रपटात घेत नाहीत, त्या ऐवजी ते तो चित्रपट प्रोड्युस करतात. “

अक्षयने हे विधान ‘करण जोहर’ आणि त्याच्या ‘धर्म प्रोडक्शन’ ला उद्देशून म्हटलं आहे यात शंका नाही. ‘धर्मा प्रोडक्शन’ हे त्याच्या नवीन चित्रपट, ‘गुड न्यूज’चे निर्माते आहेत. राज मेहता यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गुड न्यूज’ चित्रपटाच्या ट्रेलर लाँच दरम्यान अक्षयने हे गुपित उघड केलं. करनने अक्षयचा एकही चित्रपट आजपर्यंत दिग्दर्शित केलेला नाहीये.

अक्षय बोलताना पुढे म्हणाला कि “जेव्हा मोठे डिरेक्टर्स तुम्हाला त्यांच्या चित्रपट घेत नाहीत, तेव्हा तुम्हाला स्वतःलाच तुमचा प्रवास सुरु करावा लागतो. तुम्हाला मोठ्या पब्लिकेशन मध्ये काम नाही मिळत, तेव्हा तुम्ही लहान पब्लिकेशन मध्ये काम करावं लागतं. तिथून मग तुम्ही पुढे उडी घेता. पण तुम्ही घरीच बसून विचार नाही करू शकत की मोठे पब्लिकेशन मला त्यांच्या चित्रपटांमध्ये का घेत नाहीत, माझी कुवत असताना देखील.”

Leave a Reply

%d bloggers like this: