Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस मराठीच्या डब्बा गुल्ल टास्क दरम्यान मीनल-मीरामध्ये हाणामारी; पहा व्हिडीओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय असलेला वादग्रस्त शो ‘बिग बॉस मराठी’च्या सुरु असलेल्या तिसऱ्या पर्वात दररोज नवीन टास्क आणि दररोज नवीन पंगे पाहायला मिळत आहेत. अश्यातच आता घरात तयार झालेले ग्रुपसुद्धा फुटू लागले आहेत. यात प्रत्येक आठवड्यात नवनवीन टास्क रंगताना दिसत आहेत. आता लवकरच या नव्या आठवड्यात स्पर्धकांना एका नव्या टास्कचे आव्हान दिले गेले आणि या टास्कमध्ये दोस्ती यारीच्या चांगल्याच चिंधड्या उडाल्याचे पहायला मिळाले. यात मीरा आणि मीनल असे भिडले कि एकमेकांच्या अंगावर जाऊन या दोघी हाणामारीवर उतरल्या.

बिग बॉसच्या घरात अनपेक्षितरित्या पार पडलेल्या नॉमिनेशन कार्यात गायत्री व उत्कर्षने जयला नॉमिनेट केलं आणि यासह विशाल निकम, सोनाली पाटील, तृप्ती देसाई , मीनल शाह हे या आठवड्यात घरातून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले आहेत. त्यामुळे आता या सदस्यांमध्ये ‘डब्बा गुल’ हे कार्य रंगताना दिसतेय. या डब्बा गुल कार्यात दोन टीम असून दरवेळी या दोन्ही टीममधील सदस्यांमध्ये राडे होताना दिसत आहेत. इतकंच काय तर मीनल आणि मीरा या दोघींमध्ये पुन्हा एकदा टास्कदरम्यान बाचाबाची ते मारामारी असे जोरदार भांडण झाले. विशेष म्हणजे बिग बॉसच्या घराचा नियम तोडून या दोघीही एकमेकींच्या अंगावर धावून जात मारामारी करताना दिसल्या. यामुळे आता बिग बॉस काय निर्णय घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

खरंतर या टास्कदरम्यान झालं असं कि, डब्बा गुल्ल टास्क सुरु झाला आणि सोनाली खेळायला येत नाही का? असा प्रश्न मीनलने विचारला. त्यावर भलं मोठं रामायण, महाभारत असं बरंच काही घडायचं आहे, असं उत्तर सोनालीने दिलं. तिने दिलेल्या उत्तराप्रमाणेच या टास्कमध्ये झाल्याचं पाहायला मिळालं. ‘तू धक्काबुक्की का करतेस?’ असा प्रश्न मीनलने मीराला विचारला. त्यावर मीरा तिच्या अंगावर धावून जात ‘चल निघ..’, असं म्हणत तिला लांब ढकलते. त्यामुळे हा वाद वाढताना दिसतो आणि मग काय भिडले ना भाऊ.