Take a fresh look at your lifestyle.

‘द काश्मिर फाईल्स’ची BIG VICTORY’; ट्विट करीत अग्निहोत्रींनी दिली महत्वाची माहिती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सलग हाऊसफुल्ल शोजने गाजला. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने भरमसाठ कमाई करीत अभूतपूर्व यश मिळवले आहे. या चित्रपटाने आतापर्यंत २५० कोटी रुपयांहून अधिक कमाई करीत एक मोठा रेकॉर्ड बनविला आहे. पहिल्या दिवसापासून चर्चेत असेलल्या या चित्रपटाबाबत विविध मतप्रवाह पाहायला मिळाले. यानंतर आता हा चित्रपट संयुक्त अरब अमिरातीत प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही क्रॉप कटशिवाय या सेन्सॉर बोर्डने चित्रपट प्रदर्शनासाठी सकारात्मक निर्णय दिला आहे. त्यामुळे हा सर्वांत मोठा विजय असल्याचे म्हणत बिग विक्टरी लिहीत अग्निहोत्रींनी ट्विट केले आहे.

विवेक रंजन अग्निहोत्री यांनी ट्विट करीत याबाबतची माहिती दिली आहे. दरम्यान त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे कि, बहुचर्चित ‘द काश्मीर फाईल्स’ हा लवकरच सिंगापूरमध्ये प्रदर्शित होणार आहे. ‘मोठा विजय: अखेर UAE मध्ये सेन्सॉर बोर्डाकडून हिरवा कंदील मिळाला. कोणत्याही कटशिवाय हा चित्रपट पास केला असून १५ वर्षांहून अधिक वय असलेले प्रेक्षक तो पाहू शकतात. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट तिथे प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर सिंगापूरमध्येही तो प्रदर्शित होईल’. ‘भारतात, काही लोक माझ्या चित्रपटाला इस्लामोफोबिक म्हणतायत, पण इस्लामिक देशानेच माझ्या चित्रपटाला कोणत्याही कटशिवाय पास केला आहे. भारतातील प्रेक्षकांची वयोमर्यादा तर १८ वर्षांवरील ठेवली आहे, पण तिथे १५ वर्षांवरील प्रेक्षक तो चित्रपट पाहू शकतात”.

याशिवाय चित्रपटावर गेल्या अनेक दिवसांपासून टीका करणाऱ्या टीकाकारांनादेखील अग्निहोत्रींनी उत्तर दिले आहे. ते म्हणाले कि, ‘तीन आठवड्यांच्या परीक्षणानंतर इथेही हिरवा कंदील मिळाला. मुस्लिम ग्रुप्सचे अनेक प्रतिनिधी यात होते, मात्र तिथल्या सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षांनी हे स्पष्ट केलं की चित्रपटात आक्षेपार्ह असं काहीच नाही. त्यामुळे प्रत्येकाने तो पहायला हवा. युएईमध्येही हेच घडलं. परीक्षण करताना अनेकांनी विविध मतं नोंदवली, मात्र त्या सर्वांचं म्हणणं हेच होतं की, हा चित्रपट माणुसकीबद्दल भाष्य करतो, हा चित्रपट दहशतवादाच्या विरोधात भाष्य करतो, म्हणून ते सर्वजण पाहू शकतात. भारतात तर काहीजण हा चित्रपट न पाहताच त्याला विरोध करत आहेत.’ या चित्रपटात १९९० साली नरसंहाराला बळी पडलेल्या काश्मिरी पंडितांची हृदयद्रावक कथा मांडण्यात आली आहे.