Take a fresh look at your lifestyle.

मास्क लावा म्हणणारी शहनाज गिल झाली ट्रोल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस सीजन १३’ च्या माध्यमातून लोकप्रियतेचा उच्चांक गाठणारी शहनाज गिल सध्या सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. शहनाज आपल्या स्टाईल आणि लूकबाबत चांगलीच सजग झाली आहे. तिने १२ किलो वजन कमी केल्यानंतर ती आधीपेक्षा आणखीच सुंदर दिसू लागली आहे. यामुळे ती स्वतःचे ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. नुकताच तिने एक फोटो शेअर करीत लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. पण फोटोत तिच्या तोंडाला मास्क नाही हे एवढं ट्रोलिंगसाठी पुरेसं ठरलं.

अगदी काहीच तासांपूर्वी शहनाज गिलने तिचे नवे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये शहनाज खूप ग्लॅमरस दिसत आहे. हे फोटो पाहिल्यावर तिची लोक तिला बार्बी डॉल म्हणत आहेत. तिचे चाहते या फोटोंवर मोठ्या संख्येने कमेंट्स करत आहेत. शहनाज गिलने हे फोटोशूट शेअर करताना त्यासोबत लोकांना मास्क लावण्याचे आवाहन केले आहे. शहनाज गिल म्हणाली की, आपण घराबाहेर पडलात तर मास्क नक्की लावा. यावर ट्रोलर्स म्हणाले की, ‘आधी स्वत: चा मास्क लावा …’. इतकेच नव्हे तर ट्रोलर्स असेही म्हणतात की लाईक्स मिळवण्यासाठी शहनाज काहीही करते.

शहनाज कौर गिलने २०१५ साली मॉडेल इंडस्ट्रीत काम केले आहे. शहनाज कौर गिलने २०१९ मध्ये पंजाबी चित्रपटात पदार्पण केले. तिचा पहिला चित्रपट ‘काला शाह काला’ हा होता. या चित्रपटामध्ये शहनाज सरगुन मेहता, जॉर्डन संधू आणि बिन्नू ढिल्लनसोबत दिसली होती. शहनाज अनेक म्युझिक व्हिडीओमध्ये देखील दिसली आहे. लवकरच शहनाज पुन्हा एकदा सिद्धार्थ शुक्लासोबत ‘हॅबिट’ या म्युझिक व्हिडीओमध्ये दिसणार आहे.