Take a fresh look at your lifestyle.

Bigg Boss 15 – बिचुकलेने जांभई दिली आणि सलमानची सटकली; पहा व्हिडिओ

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन| सध्या ‘बिग बॉस 15’च्या घरात मिनिटं मिनिट ड्रामे सुरू आहेत. कधी कोण काय बोलेल आणि कधी कोण काय करेल याचा नेम लावणं सोडाच तुम्ही तर कल्पनासुद्धा करू शकत नाही. असे म्हणण्याचे कारण म्हणजे, घरातील स्पर्धकांनी चक्क ‘टिकट टू फिनाले’ टास्क रद्द केला. हो. हो. रद्द. फिनालेमध्ये जाण्याची संधी त्यांनी हसत हसत गमावली. मग काय सलमान भडकला आणि एकेकाचा चांगलाच क्लास घेतला. त्यात नेहमीप्रमाणे बिचुकलेवर सलमानचा पारा चढला आणि त्याचे कारण ठरले जांभई.

शुक्रवारी सलमानने घरातील सदस्यांचा क्लास घेतला. यातील एका प्रोमोमध्ये सलमान शमिता शेट्टी आणि अभिजीत बिचुकलेवर प्रचंड भडकलेला दिसतोय. तिकीट टू फिनालेचा टास्क रद्द करण्यावरून तो आधीच भडकला होता. त्यात भर ठरली बीचुकलेची जांभई. सलमान रागरागात भडकून म्हणतो, टास्क रद्द करण्यात तुम्ही सर्वांनी पीएचडी केली आहे. यानंतर त्याला असं चिडलेल पाहून सगळे स्पर्धक गंभीर होऊन माना खाली घालून गप्प ऐकत असतात. एवढ्यातच अभिजीत बिचुकले जांभई देतो आणि मग काय…? सलमानचा पारा हाय होतो आणि तो बीचुकलेला चांगलाच तासतो. 

बिचुकलेला जांभई देताना पाहून सलमानचा पार इतका वाढतो की बस… सलमान बिचुकलेला बोलतो की, बिचुकले जाओ बिस्तर पर जाके सो जाओ. ये सब मेरे साथ नहीं चलेगा. सो जाओ. यावर बिचुकले माफी मागताना दिसतो. पण सलमान त्याच्यावर इतक्या जोरात ओरडतो की, त्याचा आवाजच बंद होतो आणि तो शांतच बसतो. पूर्ण सिजनमध्ये पहिल्यांदाच सलमानचा चढलेला पारा पाहून सगळेच शॉक झाले होते. पण आपण अस म्हणू की सलमानने २०२१ चा शेवट चिडून राग बाहेर काढून केला.