Take a fresh look at your lifestyle.

BB15 – “माझी बहिण बाथरुममध्ये असती तर…”; सलमानचा प्रतिकवर अर्वाच्य शाब्दिक प्रहार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १५ सुरु काय झाला लगेच स्पर्धकांनी आपले रंग दाखवायला सुरुवात केली. मुख्य म्हणजे पहिलाच विकेंड वार आला आणि सलमान रान अनावर झाला. स्पर्धक प्रतिक सहजपाल याच्या एका कृत्याने भाईजानचा पारा चांगलाच वाढविला. वीकेंडचा वारचा आज पहिलाच दिवस असणार आहे. याआधी काही प्रोमो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातील एकात सलमानने प्रतिक सहजपालला चांगलाच जपल्याचे दिसत आहे. स्पर्धक विधी पंड्याचा उल्लेख करत सलमानने प्रतिकवर ताशेरे ओढले. गेल्या एपिसोडमध्ये प्रतिकने टास्क जिंकण्याच्या खुमखुमीत मर्यादा सोडली आणि विधी बाथरुममध्ये अंघोळ करतअसताना बाथरुमच्या दरवाजाची काडी तोडली. घरातील स्पर्धकांनी त्याला चुकीची जाणीव करून दिली असता त्याने कुणाचं ऐकलं नाहीच पण माफीही मागितली नाही.

मग काय? सलमान भाई का बोलना तोह बनता है ना? यामुळे विकेंड वारमध्ये प्रतिक सहजपालला त्याने केलेल्या कृत्याबद्दल सलमान चांगल्या आणि वाईट भाषेत त्याची कानउघाडणी करताना दिसणार आहे. या प्रोमोमध्ये सलमान चांगलाच संतापलेला दिसतोय. दरम्यान तो बोलतो कि, माझी आई किंवा बहिण बाथरुममध्ये अंघोळ करत असती तरी मी असं केल असतं. असं जर कुणी म्हणत असेल तर प्रतिक तु मुर्ख आहेस. वाह. याचा अर्थ खेळ हा आई आणि बहिणीपेक्षा मोठा आहे. विधीने मनात आणलं असतं तर तुझी लायकी काढली असती. “जर माझी बहिण असती तर मी तुझी…——……”

त्याच झालं असं कि, एक मॅप पूर्ण करण्याचा स्पर्धकांना टास्क दिला असता दरम्यान करण कुंद्राने एक मॅप शोधून काढला. शिवाय प्रतिक, शमिता व निशांत यांच्यात फूट पाडण्यातही तो यशस्वी झाला. यामुळे या तिघांमध्ये जुंपली आणि करणचा फायदा झाला. शमिताने मॅपचा तुकडा करणला दिला. हे कळताच प्रतिक भयंकर चिडला आणि तो वॉशरूमचा लॉक तोडण्याचा प्रयत्न करू लागला. करणने त्याला रोखले. पण नंतर स्क्रू ड्रायव्हरने त्याने लॉक तोडलाच. विधी पांड्या गार्डन एरियातील एका वॉशरूममध्ये आंघोळ करत असताना प्रतिक सहजपाल वॉशरूमचा लॉक तोडतो आणि विधी वॉशरूममधून बाहेर आल्यावर करण कुंद्रा, विशाल कोटियन, जय भानुशाली व अन्य सर्वांना याबाबत तक्रार करते. मग घरातील वातावरण पेटते आणि राडा सुरू होतो.