Take a fresh look at your lifestyle.

BIGG BOSS 15’चे OTT’वर पदार्पण; लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार नवे स्वरूप

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। भारतीय मनोरंजन क्षेत्रातील छोट्या पडद्यावरील अत्यंत वादग्रस्त तितकीच लोकप्रिय सिरीज म्हणजे बिग बॉस. यात काही सेन्‍सेशल व्‍यक्‍ती, लोकप्रिय चेहरे आणि मेलो ड्रामा कुटून कुटून भरलेला असतो. आता या शोबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. ती अशी कि, ‘बिग बॉस चे आगामी पर्व ओटीटी वर येणार आहे. जगातील सर्वात मोठा रिअॅलिटी शो बिग बॉसचे इंडियन एडिशन टेलिव्हिजनपूर्वी स्ट्रिमिंग व्‍यासपीठ वूटवर सुरू होत आहे. मुख्य बाब अशी कि हा शो त्याच्या कारकिर्दीत पहिल्‍यांदाच डिजिटल होण्‍यास सज्‍ज आहे.

‘बिग बॉस ओटीटी’च्‍या ६ महिन्‍यांच्‍या कार्यक्रमाचे पहिले ६ आठवडे चाहत्‍यांना २४X७ तास त्‍यांच्‍या मोबाइलवर पाहता येणार आहेत. ज्‍यामुळे प्रेक्षकांना बिग बॉसच्या घरामध्‍ये चाललेल्‍या घडामोडी जाणून घेण्‍यासोबत शोचा प्रत्‍यक्ष व सखोल सहभागाचा आनंद घेता येणार आहे. ‘बिग बॉस ओटीटी के मजे लूट’ ओन्ली ऑन वूट.. शिवाय भारतीय मनोरंजन क्षेत्रातील काही लोकप्रिय चेहरे आणि शोमधील ड्रामा बिग बॉस ओटीटी १५ ला नव्‍या उंचीवर घेऊन जाईल अशी आशा निर्मात्यांनी व्यक्त केली आहे.

बिग बॉसचा आगामी सीजन फारच वेगळा आहे. कारण यावेळी ‘जनता’ फॅक्‍टर सामान्‍य व्‍यक्‍तीला स्‍पर्धकांची, तसेच स्‍पर्धकांचे स्‍टे, टास्‍क्‍स व शोमधील त्‍यांचे अस्तित्त्व याबाबत निवड करत बिग बॉस ओटीटीची असामान्यता दाखवणार आहेत. एकंदर हा सीजन प्रेक्षकांसाठी अद्वितीय असा ठरणार आहे हे नक्की. वर्षानुवर्षे प्रेक्षकांकडून अमाप प्रेम मिळालेला वार्षिक मनोरंजनपूर्ण ‘बिग बॉस’ हा शो मनोरंजन क्षेत्रातील सर्वात बहुप्रतिक्षित व लोकप्रय शो पैकी एक आहे. त्यात यंदा हा शो आगळ्या वेगळ्या ढंगात येणार आहे. त्यामुळे आणखीच मजा येणार आहे. हि बातमी मिळताच प्रेक्षकांमध्येही उत्सुकतेचे वातावरण आहे.