Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस 15’च्या होस्टिंगचे सूत्र महेश मांजरेकरांच्या हाती; जाणून घ्या कारण

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या ‘बिग बॉस १५ आणि ‘बिग बॉस मराठी ३ हे दोन्ही रिऍलिटी शो एकाच वेळी चांगल्या टप्प्यात सुरु आहेत. यातील ‘बिग बॉस १५ चे होस्टिंग बॉलिवूड अभिनेता सलमान खान करताना दिसतो. तर बिग बॉस मराठी ३ चे होस्टिंग दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर करताना दिसतात. या दोघांचीही सूत्रसंचालनाची शैली इतकी लक्षवेधी आहे कि, प्रेक्षक आठवड्याभरात घरात काय चाललंय हे जितक्या उत्साहाने पाहत नाहीत तितक्या उत्साहाने विकेंड अर्थात आठवड्याचे शेवटचे दोन दिवस पाहतात. पण यावेळी ‘बिग बॉस १५ च्या होस्टिंगची सूत्र सलमान पूर्णपणे हाताळू शकणार नाही, अशी काही माहिती मिळत आहे.

नक्कीच हे वृत्त वाचल्यानंतर अनेक प्रेक्षकांना धक्का बसला असेल. कारण विकेंड चा वार भैजांशिवाय कसा पहायचा? भाईजान नाही तर विकेंड नाही. अश्या बऱ्याच प्रकारच्या प्रतिक्रिया तुमच्या मनातून येत असतील. शिवाय हे असं का? अर्थात सलमान शो च होस्टिंग करणार नाही का? भाईजानने शो सोडला? काय झालं? काय कारण तरी काय? असाही प्रश्न अनेकांना पडला असेल. तर मित्रांनो आम्ही तुम्हाला संफगू इच्छितो कि, ‘बिग बॉस १५ च्या विकेंड का वार चे शूट चालू असताना सलमानच्या तब्येतीने हलकी कुरकुर काढली. अर्थात सलमानला अस्वस्थ वाटू लागले आणि परिणामी त्याने थोडा ब्रेक घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

मग आता काय? सलमान नाही तर विकेंड नाही? तर मित्रांनो असं काहीही नाही. कारण सलमान ब्रेक घेताना त्याने होस्टिंगची सूत्र जबाबदार खांद्यांवर सोपविली आहेत आणि हे खांदे आहेत मांजरेकरांचे. होय. आता या विकेंडला थोडी मजा थोडी सजा दोन्ही मांजरेकरांच्याच हाती. शिवाय या विकेंडला घरात ३ वाईल्ड कार्ड एंट्री देखील होणार आहेत. ‘बिग बॉस १३ चे माजी स्पर्धक रश्मी देसाई आणि देवोलिना भट्टाचार्य या दोघीही बिग बॉस’च्या घरात एंट्री करणार आहेत. याशिवाय पारस छाब्रा हा प्रतीक्षेत आहे. तर ग्रँड धमाका म्हणजे ‘बिग बॉस मराठी २ चे गाजलेले स्पर्धक आणि सातारा जिल्यात ज्यांनी राजकारण ढवळून काढले असे अभिजित बिचुकले सुद्धा ‘बिग बॉस १५ मध्ये वाईल्ड कार्ड म्हणून एन्ट्री करणार आहेत.