हॅलो बॉलीवूड : ऑनलाईन – सलमान खानचा हिट रिअॅलिटी शो बिग बॉस लवकरच त्याच्या नवीन सीझनसह प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोची चर्चा आतापासूनच सुरू झाली आहे. या शोमध्ये सहभागी होण्याबाबत अनेक सेलिब्रिटींची नावेही समोर येत आहेत. मात्र या लिस्ट मध्ये अशा एका नावाचा (raj kundra) समावेश आहे ते ऐकून तुम्हाला धक्का बसेल.
राज कुंद्रा बिग बॉसचा भाग होणार?
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा (raj kundra) देखील सलमान खानच्या रिअॅलिटी शो बिग बॉसमध्ये दिसू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला (raj kundra) बिग बॉस 16 साठी अप्रोच करण्यात आले आहे. शोचे निर्माते आणि राज कुंद्रा यांच्यात बिग बॉसच्या संदर्भात चर्चा सुरू आहे. राज कुंद्रा बिग बॉस 16 मध्ये सहभागी होण्याचा विचार करत आहे.
शमिताने जिंकले सगळ्यांचे मन
राज कुंद्राच्या (raj kundra) आधी शिल्पा शेट्टीची बहीण शमिता शेट्टी बिग बॉसच्या शेवटच्या सीझनमध्ये दिसली होती. शमिता याआधी बिग बॉस ओटीटीचा भाग बनली होती. यानंतर ती बिग बॉस 15 मध्येही सामील झाली. या शोमध्ये शमिताचा खेळ खूप आवडला होता. तिची दबंग शैली पाहून सर्वजण थक्क झाले होते. मात्र, तिला बिग बॉस 15ची ट्रॉफी जिंकता आली नव्हती. राज (raj kundra) हे अनेकदा अनेक वादांमुळे चर्चेत असतात. अशा परिस्थितीत, जर तो बिग बॉसच्या घरात सामील झाला तर तो नक्कीच त्याच्या उपस्थितीने शोमध्ये चुरस निर्माण होईल. त्यामुळे राज कुंद्राचे फॅन्स त्याला बिग बॉस 16 मध्ये पाहण्यास उत्सुक आहेत.
Discussion about this post