Take a fresh look at your lifestyle.

बिग बॉस १३ : हिमांशी खुराणाने स्वतःची तुलना ऐश्वर्या रॉय सोबत केल्यामुळे सलमान खानही झाला अवाक

0

बॉलीवूड खबर ।  बिग बॉस १३ मधील घरात पहिल्या भव्य समाप्तीनंतर पुन्हा स्मॅशिंग एन्ट्री करण्यात आली . यामध्ये हिमांशू खुरानाची घरात एन्ट्री  म्हणजे शहनाज गिलला धक्कादायक असा झटका होता. वीकएंड का वीर या सलमान खानच्या बिग बॉस १३ मधील कार्यक्रमात वीकएंड ला थोडी धमाल बघायला मिळाली .  वीकएंड दरम्यान हिमांशी आत शिरल्यावर शहनाजने केलेल्या काही  विचित्र गोष्टीकडे सलमान खानने आवर्जून लक्ष केंद्रित केले.
ज्याप्रमाणे शहनाझने स्वत:ला पंजाब की कतरिना कैफ म्हटले होते, त्याचप्रमाणे सलमान खानने हिमांशीला विचारले की, तू कोणत्या  बॉलिवूड अभिनेत्री सारखी स्वतःला समजते..? मात्र हींशीच्या उत्तरामुळे सलमानने तो विषय बदलवण्याचा प्रयत्न केला.  हिमांशी उत्तर देतांना म्हणाली की काही लोक तिला ऐश्वर्या राय म्हणतात. हे एकूण सलमान खान गोंधळून गेला आणि विषयाकडे दुर्लक्ष करून दुसऱ्या घडामोडी कडे लक्ष केंद्रित केले.

Leave a Reply

%d bloggers like this: