Take a fresh look at your lifestyle.

‘जोडी दोघांची दिसते चिकनी’; बिग बॉस फेम मीरा- जयच्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा अलीकडेच तिसरा सीजन जलौषात पार पडला. या शोच्या दरम्यान त्यात सहभागी स्पर्धकांपैकी मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने अजूनही चचांगलेच चर्चेत आहेत. शो मध्ये यांचा असा वेगळा ग्रुप पडला होता. ज्यात ताकदीने खेळणाऱ्या स्पर्धकांमध्ये मीरा आणि जायचे नाव घेतले जय. शो नंतर आता थेट एका व्हिडीओ अल्बममध्ये मीरा आणि जय एकमेकांसोबत चक्क रोमँटिक अंदाजात दिसले आहेत. हे गं सप्तसूर म्युझिक या युट्युब चॅनेलवर प्रदर्शित झालं असून आतापर्यंत ९ लाखांहून जास्त व्ह्यूज या गाण्याने मिळवले आहेत.

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वाचा उपविजेता जय दुधाणे आणि लेडी बिग बॉस मीरा जगन्नाथ पहिल्यांदाच एका म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र दिसले आहेत. ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ असे या म्युझिक व्हीडिओचे नाव आहे. सप्तसूर म्युझिक या युट्यूब चॅनलवर ‘जोडी दोघांची दिसते चिकनी’ हा म्युझिक व्हीडिओ रिलीज झाला आहे. या गाण्याला त्यांच्या चाहत्यांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

‘जोडी दोघांची दिसते चिकनी, कोलीवाऱ्याची राजा नी राणी’ असे या गाण्याचे बोल आहेत. साईनाथ राजाध्यक्ष यांनी या म्युझिक व्हिडिओची निर्मिती केली आहे. तर बीना राजाध्यक्ष या सहनिर्मात्या आहेत. केवल वाळंज आणि सोनाली सोनावणे या नव्या पण उत्कृष्ट गायन शैली असणाऱ्या गायकांनी या गाण्याला आपला आवाज दिला आहे. तर राजेंद्र वैद्य कल्याणकर यांच्या शब्दांना अमेय मुळे यांनी संगीत दिल आहे.

जय दुधाणेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, एमटीव्ही वाहिनीवरील ‘स्प्लिट्सव्हिला’ या रिअॅलिटी शोच्या तेराव्या सीझनमधून जय दुधाणे प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर तो मराठी बिगबॉसमध्ये दिसला आणि यात त्याने अंतिम फेरीत मजल मारून उपविजेतेपद मिळवलं. तर मीरा जगन्नाथाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तिने ‘माझ्या नवऱ्याची बायको’ आणि ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मराठी मालिकांमधून आपला अभिनय प्रवास सुरू केला. यानंतर तीसुद्धा मराठी बिग बॉसच्या तिसऱ्या सिजनमध्ये जयसोबत दिसली. साईनाथ राजाध्यक्षनिर्मित ‘तुझी माझी यारी’ या प्लॅनेट मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज झालेल्या वेबसिरीजमध्येदेखील मीरा जगन्नाथने मुख्य भूमिका केली आहे.