Take a fresh look at your lifestyle.

टीव्ही जगताला मोठा धक्का; बिग बॉस फेम सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही मालिका जगतातील अत्यंत लोकप्रिय चेहरा आणि बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे निधन झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हृदयविकराच्या झटक्याने सिद्धार्थचे अकाली निधन झाले आहे. हि बातमी पसरताच त्याच्या चाहत्यांमध्ये शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. वयाच्या ४०’व्या वर्षी सिद्धार्थने संपूर्ण जगाचा निरोप घेतला आहे. मुंबईतील कूपर रुग्णालयाने त्याला मृत घोषित केलं आहे. सिद्धार्थने झोपण्याआधी काही औषधे घेतली होती, पण त्यानंतर तो उठू शकला नाही. यानंतर सिद्धार्थचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचे रुग्णालयाने पुष्टी केली.

सिद्धार्थचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मुंबई पोलिसांची टीम कूपर रुग्णालयामध्ये पोहोचली आहे. सिद्धार्थ शुक्लाचे शवविच्छेदन दुपारी साडे बारा वाजता केले जाईल, असे म्हटले जात आहे.

सिद्धार्थ शुक्लाने हिंदी मालिकांसह, बॉलिवूड चित्रपट आणि विविध रिऍलिटी शोमध्ये देखील आपली प्रतिमा दर्शविली आहे. रोखठोक बोली आणि अलग अंदाज यामुळे सिद्धार्थचा स्वतःचा वेगळा असा चाहता वर्ग आहे. अत्यंत लोकप्रिय आणि वादग्रस्त शो अर्थात बिग बॉसच्या १३ व्य सिजनमध्ये सिद्धार्थ शुक्लाने आपली अलंगचा छाप प्रेक्षकांवर पडली आणि लोकांच्या मनावर राज्य केले. सध्या त्याच्या निधनाचे वृत्त पसरताच त्याच्या चाहत्यांनी शोक व्यक्त केला आहे. हिंदी मालिका विश्वातील अनेको कलाकारांनी सिद्धार्थला श्रद्धांजली वाहत हळहळ व्यक्त केली आहे.

अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने मॉडेल, होस्ट आणि अभिनेता म्हणून हिंदी टेलिव्हिजन- चित्रपट इंडस्ट्रीमध्ये काम केले आहे. ‘ब्रोकन बट ब्यूटीफुल ३’, ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या मालिकांमधील भूमिकांसाठी सिद्धार्थची एक वेगळी ओळख होती. यानंतर बिग बॉस १३ आणि फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी ७च्या रिअॅलिटी शोचे विजेतेपद मिळवून त्याने प्रेक्षकांची वाहवाह मिळविली. सावधान इंडिया आणि इंडियाज गॉट टॅलेंट या शोचे त्याने होस्ट म्हणून सूत्र सांभाळले होते. तर २०१४ साली सिद्धार्थ ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’मध्ये वरून धवन आणि आलिया भट यांच्यासोबत सहाय्यक भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

अलीकडेच बिग बॉसच्या नव्या कोऱ्या पर्वातही सिद्धार्थने त्याची लाडकी मैत्रीण शहनाज गिलसोबत हजेरी लावली होती. शहनाज आणि त्याची मैत्री ‘बिग बॉस १३ च्या सीजन दरम्यान झाली असून त्यांची केमिस्ट्री अजूनही लोकांच्या लक्षात आहे. यानंतर सिद्धार्थचे असे अचानक जाणे त्याच्या चाहत्यांना मंजूर नसून सोशल मीडियाच्या माध्यमातून ते आक्रोश व्यक्त करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.