Take a fresh look at your lifestyle.

BiggBoss मराठी 3- जय आणि स्नेहाची जवळीक प्रेम का गेम?; सोशल मीडियावर ट्रोलिंगला जोर

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या मराठीच्या घरात आता कुठे खेळ जोशात आणि चांगलाच रंगात आला आहे. नवनवे टास्क आणि यारी दोस्ती हे तर ‘बिग बॉसच्या घराचे समीकरण आहेच. पण आता आणखी एक नवे समीकरण दिसू लागले आहे. याला प्रेम म्हणावे का गेम? असा एक नवा प्रश्न उभा राहिला आहे. आतापर्यंत बिग बॉस मराठीचे २ पर्व पार पडले आणि यात दोन्हीत काही स्पर्धकांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगली. त्यानंतर आता या पर्वातही असेच काहीसे दिसू लागले आहे. काही दिवसांपूर्वी सोनाली- विशाल यांची मैत्री चर्चेचा विषय होती. तर आज स्नेहा आणि जयची जवळीक प्रेक्षकांच्या नजरेत खटकते आहे.

कलर्स मराठीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेला एक प्रोमो याचे कारण ठरला आहे. या प्रोमोमध्ये स्नेहा वाघ आणि जय दुधाणे यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. इतकंच काय तर, जय अप्रत्यक्षपणे प्रेमाची कबुली देखील देतोय. ‘वक्त नहीं बदलता, मगर दिल बदलते हैं.. ‘असं म्हणत जय स्नेहाला काही सांगण्याचा प्रयत्न करतोय. मुख्य म्हणजे स्नेहालादेखील जयच्या भावना समजून स्मित हास्य करताना दिसत आहे. दरम्यान, या प्रोमोमधून या दोघांचं नातं जरी स्पष्टपणे जाणवत असलं तरी देखील नेटकऱ्यांनी स्नेहाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. याचे कारण म्हणजे यापूर्वी स्नेहाचा दोन वेळा संसार मोडला आहे. त्यामुळे पुन्हा ती प्रेमात पडली की काय? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

स्नेहा आणि जय यांची जवळीक पाहून नेटकऱ्यांनी स्नेहावर टीका करायला सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने म्हटले कि, आता तिसरा नवरा करणार वाटत. इतकेच नव्हे तर, हा प्रयत्न फ्लाॅप झालाय. बाहेर हसतायत सगळे या mismatch ला, असेही एका नेटकाऱ्याने लिहिले. याशिवाय एका नेटकऱ्याने म्हटले कि, अक्कल घरी ठेवून आलीये ती. एक तर लफडे व्हावे ही बिग बॉस ची ईच्छा, असे म्हणत एका नेटकाऱ्याने स्नेहा- जय आणि यांच्यासह अगदी बिग बॉस शोवरच टीका केली आहे.