Take a fresh look at your lifestyle.

लढले, भिडले, बाहेर पडले..; BB मराठी 3’चे माजी स्पर्धक तृप्ती, सुरेखा आणि अक्षय यांच्या भेटीचा फोटो वायरल

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठी सीजन ३ मधून एक एक करून एव्हिक्ट झालेले ३ माजी स्पर्धक नुकतेच घराबाहेर एकत्र भेटल्याचा फोटो वायरल झाला आहे. सुरेखा कुडची, अक्षय वाघमारे आणि तृप्ती देसाई या तिघांचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या घरात असताना या स्पर्धकांमध्ये कधी दोस्ती, कधी मस्ती तर कधी कुस्ती पाहायला मिळाली. पण आता घराबाहेर पडल्यानंतर मात्र हे आपली मैत्री टिकवणार असे दिसत आहे.

अक्षय वाघमारे हा सीजनच्या पहिल्याच नॉमिनेशन प्रक्रियेत एव्हिक्ट झाला होता. मात्र तृप्ती देसाई आणि सुरेखा कुडची बराच काळ घरात टिकल्या. या दोघींमध्ये कधी मैत्री तर कधी हमरी तुमरी दिसून आली. घरातून बाहेर पडताना मिळालेल्या विशेष अधिकाराचा वापर करून सुरेखा यांनी तृप्ती देसाईंना कॅप्टन केलं होतं. यानंतर पुढच्या आठवड्यात तृप्ती देसाई घरातून एव्हिक्ट झाल्या. यानंतर हे तिघेही पुण्यात भेटले होते आणि तेव्हाचाच हा फोटो वायरल होत आहे. हा फोटो सुरेखा कुडची आणि तृप्ती देसाई या दोघींनीही आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

हा फोटो शेअर करताना सुरेखा कुडची यांनी लिहिलं आहे कि, बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर आज एकत्र भेटण्याचा योग आला..  @trupidesai20 @akshayswaghmare तुम्हाला भेटून खूप आनंद झाला… बिग बॉसच्या घरातील सर्व आठवणी पुन्हा जागृत झाल्या… भांडण तंटे, मस्ती, रुसवे फुगवे.. अगदी सर्व काही… आपली बाकी मंडळी आत छान खेळत आहेत.. त्या सगळ्यांना शुभेच्छा… बिग बॉस संपल्यावर आपण सगळे एकत्र भेटूच… आणि ही मैत्री कायम ठेऊ…. मिस यू ऑल.

तर तृप्ती देसाई यांनी हा फोटो शेअर करीत लिहिले कि, मी ,सुरेखाताई कुडची आणि अक्षय वाघमारे आज पुण्यात एकत्र भेटलो….. दिवसभर वेगवेगळ्या विषयांवर गप्पा, बिग बॉसच्या घरातील गोड, कटू आठवणी यावर चर्चा झाली, आज भरपूर हसलोसुद्धा… बिग बॉसच्या घरात काही मुद्द्यांवरून आमचे खटके सुद्धा उडाले असतील पण बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यावर आमची निखळ मैत्री कायमस्वरूपी राहील.