Take a fresh look at your lifestyle.

BB मराठी 3 – सुरेखा कुडची आणि आदिश वैद्य भिडले; जाणून घ्या नेमके काय घडले?

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीच्या घरामध्ये पहिली वाईल्ड कार्ड एंट्री झाली आणि अगदी पहिल्याच दिवसापासून वादाला सुरुवात झाली. अगदी आदिशने घरात पाय टाकल्यापासून त्याचे प्रत्येक सदस्यासोबत खटके उडाल्याचे पाहायला मिळले. आधी जय मग स्नेहा आणि आता सुरेख कुडची. होय. आदीशचं सुरेखा कुडचीसोबत चांगलंच कडाक्याचं भांडण झालं आहे. सध्या बिग बॉसने सदस्यांवर “करूया आता कल्ला” हे साप्ताहिक कार्य सोपवले आहे. त्यामुळे आजच्या भागात BB Collegeमध्ये सुरेखा कुडची, मीरा जगन्नाथ, सोनाली पाटील हे प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांचे क्लास घेणार आहेत. या दरम्यान आदींसह आणि सुरेखा यांच्या तारा तुटल्याचे दिसणार आहे.

उत्कर्ष, दादूस, आदिश आणि सोनाली यांच्या क्लासनंतर सुरेखा कुडची हे या टास्कमध्ये प्राध्यापक म्हणून क्लास घ्यायला येणार आहेत. क्लासमध्ये आल्यानंतर त्यांनी स्नेहा वाघचे कौतुक केले, विशाल निकमशी गंमतीशीर संवाद साधला. पण काही वेळानंतर मात्र घराचे वातावरण थोडे.. नाही नाही.. थोडे जास्तच बदलले. सुरेख आणि आदिशमध्ये अशी काही वादाची ठिणगी पडली कि हे अगदी बाचाबाचीवर उतरले. सुरेखा कुडची यांचा क्लास सुरू असताना आदिश वैद्य त्यांना म्हणाला, “चला चला कार्य सुरू ठेवा”. त्यावर सुरेखाताई म्हणाल्या, “प्रोफेसर आदिश वैद्य यांना विनंती “मी” करते की प्लीझ (तोंड बंद ठेवा). कारण तुमची जस्ट एंट्री झाली आहे BB मध्ये, आम्ही जुने आहोत.”

आता सुरेख कुडचींची प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आदिश कसा काय शांत बसणार. त्याला त्याचा राग अनावर झाला आणि तो रागारागातच बोलू लागला कि, “कालपर्यंत गेम खेळायचा नव्हता ना या बाईला, स्वत:ला जायचे होते कालपर्यंत बाहेर. टॉप ५ कंटेस्टंट.” आता या वादाचे रूपांतर काय झाले आणि कुठपर्यंत यांचे परे वाढले हे पाहण्यासाठी तुम्हाला आजचा भाग पाहावा लागेल. त्यामुळे बघत रहा बिग बॉस मराठी सिझन तिसरा रात्री ९.३० वाजता मराठमोळी वाहिनी कलर्स मराठीवर.