Take a fresh look at your lifestyle.

BB मराठी 3 – मीरा लावणार आविष्कारची वाट?; मीराचे वाढते वाद पाहून प्रेक्षक विटले

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस मराठीचा नवाकोरा तिसरा सीजन नुकताच सुरु झाला आहे. अनलॉक एंटरटेनमेंट म्हणत या सिजनची चर्चा सुरु झाली आणि खऱ्या अर्थाने हा सीजन एंटरटेनमेंटचा तडका आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण अगदी काहीच दिवसात घरातील सदस्यांनी आपले रंग खऱ्या अर्थाने दाखवायला सुरुवात केली आहे. या बिग बॉस मराठीच्या घरामध्ये १५ वेगवेगळ्या स्वभावाचे लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे वादाची ठिणगी पडणारच ना खटके तर उडणारच ना? तसेच काहीसे या घरात पहायला मिळत आहे. बिग बॉस मराठीची स्पर्धक मीरा जगन्नाथ अगदी पहिल्या दिवसापासून काहीना काही कारणावरून स्पर्धकांसह लढो मरो करताना दिसतेय. मग कधी ते स्नेहा वाघ असो नाहीतर कधी जय. तिला भांडायला कुणीही चालत असच दिसतंय. असं आम्ही नाही प्रेक्षक वर्ग म्हणतोय. अगदी पहिल्या दिवसापासून फुल्ल भिडणारी मीरा आता प्रेक्षकांना बोरिंग वाटू लागली आहे.

आजच्या भागात मीरा आणि आविष्कारमध्ये वादाची ठिणगी पडणार असे दिसत आहे. कारण मीराला आविष्कार सतत सांगायचं प्रयत्न करतोय की “बाकीच्या सदस्यांनी जसे आवरून ठेवले आहे तसे तरी किमान ठेवावे”, तसे करण्यास मीराने साफ नकार दिला आणि हे आतापासून नाही पहिल्या दिवसापासून तसेच आहे असे ती म्हणाली. त्यावरून वाद पुढे वाढला आणि आविष्कार म्हणाला, “पहिल्या दिवसाचे मला सांगू नकोस, प्रत्येक जण स्वत:चे काम करतोय. बाकी साफ सफाई करणं माझं काम आहे. तुला मुद्दाम टाकायचे असेल, तर मी बघतो काय करायचे. मीराचे त्यावर म्हणणे आहे, “मी तुम्हांला एकच काम सांगते आहे, तुम्हाला करायचे असेल तर करा, नसेल जमणार तर तुम्ही मला नाही म्हणून सांगा. मी तशी तक्रार करेन. मी आता करणारच आहे तक्रार.

यावर मीरा थांबतोय कुठे तर ती पुढे म्हणते कि, “पहिल्या दिवसापासून हे मला त्रास देत आहेत. रोज सकाळी हेच. त्यांनी कालपासून ठरवले आहे की ते मला नडणार आहेत. जर मी नडायला गेले ना, यांची तर मग मी वाट लावेन. मी शांत आहे कारण ते दोन – दोन काम करत आहेत. दुसर्‍या दिवशी सांगितले होते पहिले बेडरूम करायची आणि मग किचन. मग का नाही ऐकत, मी नाही ना अडून बसले त्यावर”. यावरून आता मीरा आणि आविष्कार मधला वाद सुरू राहिल की ती इथेच थांबेल हे आज कळेल.

पण मीराचे न संपणारे वाद याहून प्रेक्षक वर्ग फारच विटल्याचे दिसत आहे. काहीजण तर तिला बाहेर काढा अशीही मागणी करीत आहेत. आता पुढे मीराचा गेम काय असेल हे आजच्या भागात कळेल.