Take a fresh look at your lifestyle.

BB मराठीच्या मीरा – उत्कर्षचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल; प्रेक्षकांनी सुनावली खरी खोटी

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस मराठी’चं तिसरं पर्व एकदम जंगी चालू असताना आता शेवटचे काहीच दिवस राहिले आहेत. दरम्यान घरात रोज नवे राडे, नवी भांडण आणि मैत्रीचे नवे बंध पाहायला मिळत आहेत. तसेच घरातल्या कितीतरी नात्यांना वेगळेच वळण येत आहे. सध्या स्पर्धक उत्कर्ष शिंदे आणि मीरा जगन्नाथचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात उत्कर्ष मीराचा हात दाबताना दिसतोय. यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. या व्हिडीओत एकीकडे उत्कर्ष मीराचे हात दाबताना दिसत आहे, तर दुसरीकडे विकास आणि सोनाली यांच्यात त्यांच्यावर चर्चा सुरु आहे. दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशी काहीशी हि चर्चा होती. यावर आता मीराच्या अधिकृत इंस्टापेजवर एक व्हिडीओ पोस्ट केली आहे. हि व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी मात्र मीरा आणि उत्कर्षलाच फैलावर घेतलं आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘आपल्या मीराच्या हाताला लागलं आहे, ह्याचा तिने issue केला नाही ते बहुतेक तिचं चुकलं कारण उत्कर्ष तिचा हात दाबून देत होता फक्त ह्या एकच विडिओच आता भांडवल केलं जातं आहे. ह्याला विकसित बुध्दी म्हणावं की अविकसित?मैत्री काय असते ही व्याख्याच मुळात यांना माहित नसावी. काय वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ पाहून?’. यानंतर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. नुसता व्हायरल नाही तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सवरच चर्चा सुरु झाली आहे.

 

या पोस्टवर काही प्रेक्षकांनी मीराला उलट बोल सुनावले आहेत, तर काहींनी मीराची बाजू घेत विकास सोनालीला फैलावर घेतलंय. एका चाहत्याने लिहिले की, ‘जेव्हा ती घरात फेक love story म्हणून. चिडवत होती विशाल आणि सोनालीला तेव्हा काय होते मग? …तेव्हा कुठली बुध्दी होती विकसित की अविकसित ….’. यानंतर आणखी एका प्रेक्षकाने लिहिले की, ‘विकास मुलीची आजिबात रिस्पेक्ट करत नाही. पहिले हयांनी विशाल सोनालीमध्ये काड्या लावून सोनालीच्या कॅरक्टरची वाट लावली आणि त्यामध्ये विशालला व्हिलन दाखवल आणि स्वतःला हिरो करण्याचा प्रयत्न केला. नंतर गायत्री आणि जयमध्ये हात चेपण्याचा चुकीचा अर्थ लोकांसमोर उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि आता मीरा च चरित्र खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. Game साठी तो कोणत्याही लेव्हल ला जात आहे @maheshmanjrekar इथे तुमची मुलगी असती तर काय केले असते. आणि ह्या मध्ये सोनाली पण साथ देत आहे त्याचा. खूपच चुकीचं आहे हे..’