Take a fresh look at your lifestyle.

मनोरंजनाची सेटलमेंट.. अनलॉक एंटरटेनमेंट; ‘बिग बॉस मराठी 3’ या दिवशी सुरु होणार

0

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय रिएलिटी शो बिग बॉस मराठीचा तिसरा सीजन आता लवकरच सुरु होणार आहे. या सीझनची प्रेक्षक गेल्या कितीतरी दिवसांपासून अतिशय उत्सुकतेने वाट पाहत होते. त्यामुळे अखेर आता प्रेक्षकांची प्रतीक्षा संपली आहे. कारण येत्या १९ सप्टेंबर २०२१ रोजी हा शो प्रेक्षकांचे फुल्ल एंटरटेनमेंट करण्यासाठी येत आहे. कलर्स मराठीवर बिग बॉस मराठी या शोचे आधीचे दोन्ही पर्व अत्यंत यशस्वी झाल्यानंतर आता बिग बॉस मी,मराठी ३ सुरु होत आहे. काही दिवसांपूर्वी या शोचा एक प्रोमो रिलीज झाला होता. या प्रोमो व्हिडिओनंतर प्रेक्षकांची शोबद्दलची उत्सुकता शिगेला पोचली होती.

या शोचे होस्ट अर्थात महेश मांजरेकर यांचे सूत्रसंचालन म्हणजे प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणीच. तसेच कार्यक्रमातील सदस्य, त्यांची भांडण, त्यांची मैत्री मग नॉमिनेशन, एलिमिनेशन, कॅप्टनसी, टास्क आणि अखेर ट्रॉफीचा विजेता अश्या विविध गणसूत्रांनी भरलेला हा शो प्रेक्षकांची मने जिंकण्यात नेहमीच यशस्वी राहिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी आता हे घर सज्ज झाले आहे. येत्या १९ सप्टेंबर २०२१पासून बिग बॉस मराठीचा तिसरा सीझन प्रेक्षकांना भुलवणार आणि अक्खा महाराष्ट्र हिलवणार.

बिगबॉस मराठीच्या या तिसर्‍या पर्वाच्या नव्या कोऱ्या प्रोमोचे शूट नुकतेच महेश मांजरेकर यांनी संपवले. यानंतर हा टीझर लॉंच झाला आणि तेव्हापासून या शोची चर्चा खतरनाक सुरु आहे. पुन्हा एकदा बिग बॉसचा तो आवाज आणि बिग बॉसच्या घरातील छोटे मोठे किस्से संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांची उत्सुकता ताणणार आहेत. कारण पुन्हा एकदा हा खेळ सॉलिड रंगणार आहे. परंतु अद्याप बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणते सेलिब्रेटी जातील याबाबत केवळ तर्क बांधणे सुरु आहे. पण आता हि प्रतीक्षा देखील संपेल आणि लवकरच कळेल कोण कोण असणार आहेत या सिझनमधील सदस्य? कसे असणार बिग बॉस ३ चे घर? आणि काय शिजणार या नव्या घरात? यासाठी थोडी उत्सुकता अशीच कायम ठेवा आणि बिग बॉस मराठी १९ सप्टेंबरपासून संध्या ७.०० वा. आणि सोम ते शनि रात्री ९.३० वाजता पहा.